शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा बॅरेज दरवाज्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:16 IST

लाखो लिटर पाणी वाया : अनेक पाणीपुरवठा योजनांना येत्या काळात झळ बसणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील बॅरेजच्या  दरवाज्यांना गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. या बॅरेजमधून पाणीपुरवठा होत असलेल्या गावांना येत्या महिन्यात पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येथील बॅरेजच्या अनेक गेटला गळती लागली असून, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बॅरेजमधून सारंगखेडा, कळंबू, टेंभा व शहादा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या बॅरेजला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात या गावांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे. या बॅरेजमध्ये सध्या 30 ते 35 टक्केच पाणी साठा आहे. मात्र तोही येथील गेटला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच या बॅरेजमधून परिसरातील अनेक शेतक:यांनी परवानी घेवून लाखो रुपये खचरून पाईपलाईनद्वारे शेतार्पयत पाणी नेले आहे. ऐन उन्हाळ्यात पपई व कापूस लागवडीसह उभ्या असलेल्या ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  आधीच या बॅरेजचे पाणी शोभेची वस्तू म्हणून चर्चीले जात असतांना संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी व ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला सोमोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.सारंगखेडा बॅरेज पूर्णत्वास आल्यानंतर परिसरातील शेतक:यांनी आनंद व्यक्त केला होता. या वेळी बॅरेजमधील पाणी उपसा सिंचनाद्वारे शेतार्पयत जाणार अशी अपेक्षा शेतक:यांना होती. मात्र ती अपेक्षाच राहील. येथील पाणी मोजक्याच शेतक:यांनी खाजगी उपसा सिंचनाद्वारे लाखो रुपये खचरून शेतार्पयत नेले आहे. या बॅरेजला लागलेल्या लिकेजमुळे दिवसेंदिवसे पाणीसाठा कमी होत असल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.