लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवैध रेती वाहतूक व उपसा करणा:यांवर कारवाई केल्याचा राग येवून तिघांनी तहसीलदार व पथकातील अधिकारी, कर्मचा:यांच्या अंगावर कार चालवून नेण्याचा प्रय} केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने तिघांना सात वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुमन आसू गावीत, रमण आसू गावीत, रा.जामतलाव व धना रुबजी गावीत, रा.मोरथुवा, ता.नवापूर असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची संक्षीप्त हकीकत अशी : 28 जानेवारी 2013 मध्ये नवापूरचे तत्कालीन तहसीलदार संदीप भोसले हे नंदुरबारमधील बैठक आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता नवापूरकडे जात होते. त्यांच्यासोबत पालिकेचे कर्मचारी राजेंद्र गवते, अनिल सोनार, पोलीस कर्मचारी निजाम पाडवी व चालक दिलीप चौरे होते. यावेळी त्यांना अवैध रेतीचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच मंडळ अधिकारी टी.आर.वसावे, दिलीप कुलकर्णी, विनायक गावीत, शिवाजी यादव, जयेश राऊळ, प्रकाश जामोदकर व ङोड.के.गायकवाड यांना करंजवेल येथे बोलविले. तेथे सरपणी नदीतून रेतीचा उपसा होत असल्याचे सांगितले. पथक व तहसीलदार तेथे गेल्यावर त्यांनी उपसा करणा:यांवर कारवाई करून तेथे असलेल्या ट्रकवरही (क्रमांक जीजे 16-यू 7416) कारवाई केली. त्यामुळे चालकाने तेथून पळ काढला. कारवाई केल्यानंतर तहसीलदार संदीप भोसले व पथक परत जात असतांना तीनटेंभा शिवारात कारने त्यांचा रस्ता अडविला. कारमधून तीन जण उतरले त्यांनी तहसीलदार भोसले यांना ट्रकवर कारवाई केली तर महाग पडेल असे सांगून धमकी दिली. त्यानंतर ते सर्व गाडीत बसून जात असतांना रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या तहसीलदारांवर वाहन चालविण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते बचावले. त्यानंतर पथक मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा थोडय़ा वेळाने तीच कार पुन्हा येवून तहसीलदाराच्या वाहनाला कट मारून निघून नेली. याबाबत तहसीलदारांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व ठार मारण्याचा प्रय} प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायाधिश प्रमोद तरारे यांच्यासमोर या केसचे कामकाज चालले. न्यायालयाने सर्व बाबी पडताळून व साक्षी पुरावे तपासून आरोपी सुमन आसू गावीत, रमण आसू गावीत व धना रुबजी गावीत यांना ठार मारण्याच्या प्रय} प्रकरणी सात वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र फौजदार रमेश वराडे यांनी दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अॅड.व्ही.सी. चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक गिरीश पाटील व नितीन साबळे होते. या निकालाकडे नवापूर तालुक्याचे लक्ष लागून होते.
सक्त मजुरीच्या शिक्षेमुळे वाळू तस्कर धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:58 IST