शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून येणाऱ्या वाळू साठ्याची तपासणी होणार, पथकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

शासनाने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार परराज्यातून वाळू व रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गौण ...

शासनाने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार परराज्यातून वाळू व रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करणे बंधनकारक राहील. परराज्यातून वैध मार्गाने येणाऱ्या वाळूची अनुज्ञप्ती क्षेत्रीय कार्यालयाने तपासून त्या राज्यातून आलेली वाळू वैध परवान्याद्वारे आल्याची खात्री करावी. संबंधित व्यक्ती किंवा संस्था स्वत:च्या वापरासाठी परराज्यातून आणलेला वाळूसाठा न करता सरळ बांधकामाच्या ठिकाणी नेणार असल्यास सदर व्यक्ती किंवा संस्थेकडे त्या राज्यातील वैध वाहतूक पास परिमाणासह असणे आवश्यक आहे.

संबंधित व्यक्ती किंवा संस्था वाळूचा साठा करून विक्री करणार असल्यास महाराष्ट्र राज्य गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मधील तरतुदीनुसार व्यापारी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार व्यापारी परवान्याचे नूतनीकरण करण्यात येईल. परराज्यातून रस्त्याने अथवा जलमार्गाने आणलेली वाळू महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करणार असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परराज्यातील रेल्वेने आलेली वाळू ज्या रेल्वेस्थानकावर रिकामी करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यात संबंधिताने राज्य शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या स्वामित्वधन दराच्या १० टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक राहील. संबंधित रकमेचा भरणा केल्यानंतर झिरो रॉयल्टी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे.

परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा संबंधित व्यक्ती किंवा संस्था करणार असतील तर ती जमीन अकृषक असली पाहिजे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती किंवा संस्था यांनी वाळूचा साठा व विक्री होणाऱ्या वाळूची दैनंदिन नोंद साठा नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. सदर नोंदवहीची क्षेत्रीय कार्यालयाकडून तपासणी करण्यात येईल. परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा वैध परवान्यापेक्षा जास्त आढळल्यास किंवा झिरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केलेली आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार दंडात्मक कारवाईस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.