शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोनच महिन्यात बाजारात 39 हजार क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:03 IST

रेड चिली फिव्हर : दोन वर्षातील विक्रमी उलाढाल

नंदुरबार : बाजार समितीत दोन महिन्याच्या कालावधीत 39 हजार क्विंटल मिरची आवक झाली आह़े विक्रमी अशा या आवकमुळे बाजार समितीसह व्यापारी, किरकोळ व्यापारी, आडतदार आणि मजूर यांच्यात उत्साह संचारला असून शेतक:यांना दुष्काळात दिलासा मिळाला आह़े लाल मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मिरचीची आवक कमी झाली होती़ मिरची लागवडीत आलेली घट, पडलेले दर, मिरची सुकवण्यासाठी जागेची कमतरता आणि परप्रांतीय व्यापा:यांकडून जिल्ह्यातील मिरची पळवून नेण्याच्या प्रकारांमुळे मिरची उद्योग संकटात सापडला होता़ यंदा मात्र या उद्योगाला पुन्हा झळाळी आली आह़े 1 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर या दोनच महिन्याच्या हंगामात 38 हजार 975 क्विंटल मिरचीची आवक झाली होती़ ही आवक आणखी वाढणार असल्याने पाच वर्षाच्या खंडानंतर मिरची 70 हजार क्विंटलचा आकडा पार करणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े बाजारात मिरची आणणा:या शेतक:यांना गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत चांगले दर मिळाल्याने शेतक:यांमध्ये उत्साह आह़े आजघडीस ओल्या लाल मिरचीला 1 हजार 945 ते 3 हजार 500 तर कोरडय़ा मिरचीला 5 हजार 600 ते 8 हजार रूपये प्रतिक्विंटल दर आहेत़  गेल्या वर्षाच्या हंगामात लाल ओल्या मिरचीला 1 हजार 600 रूपयांर्प्यत दर होत़े यंदा दरवाढ झाल्याने नंदुरबार, शहादा तालुक्यांसह लगतच्या गुजरात राज्यातील शेतकरी दर दिवशी बाजारात मिरची आणत आहेत़  नंदुरबार बाजार समितीत मिरची खरेदी करणारे 22 व्यापारी असून अद्याप मध्यप्रदेश आणि इतर राज्यातील शेतक:यांकडून मिरची विक्रीसाठी आणणे शिल्लक आह़े ही मिरची दिवाळीत दाखल होणार असल्याने यंदा व्यापा:यांची दिवाळी होणार आह़े 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2017 या काळात केवळ 6 हजार 886 क्विंटल मिरची आवक झाली होती़ या मिरचीचा सर्वसाधारण दर हा 1 हजार 629 रूपये होता़ या आवकच्या दहापट मिरची आवक झाली असून यंदाच्या वर्षात या दरांमध्ये सातत्याने वाढ झाल्याने शेतक:यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आह़े