शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या बैलबाजारात वर्षभरात 254 बैलांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:23 IST

नंदुरबार : कधीकाळी बैलांच्या खरेदी विक्रीतून होणा:या उलाढालीतून अनेक कुटूंबांची देखभाल करण्यास सहाय्यकारी ठरणारा नंदुरबारचा बैलबाजाराला गेल्या पाच वर्षात ...

नंदुरबार : कधीकाळी बैलांच्या खरेदी विक्रीतून होणा:या उलाढालीतून अनेक कुटूंबांची देखभाल करण्यास सहाय्यकारी ठरणारा नंदुरबारचा बैलबाजाराला गेल्या पाच वर्षात उतरती कळा लागली आह़े यातून यंदाच्या वर्षात केवळ 254 बैलांची विक्री झाली आह़े नंदुरबार बाजार समितीच्या आवारात मंगळवारी भरणा:या आठवडे बाजाराच्या दिवशी बैलबाजार भरवण्याची प्रथा आह़े पूर्वी शहरातील हाटदरवाजा भागात हा बाजार भरवला जात होता़ कालांतराने बाजार समितीची निर्मिती झाल्यावर याच परिसरात बैल बाजार सुरु करण्यात आला़ जिल्हानिर्मितीनंतर गुजरातसह धुळे जिल्ह्यातून येणारे बैलविक्रेते आणि व्यापारी यांच्या वावरामुळे येथे प्रत्येक आठवडय़ाला साधारण 200 बैलांची विक्री होऊन त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत होती़ परंतू गेल्या 2010 नंतर या बाजारातील व्यवहारांना घरघर लागून बैलांची आवक कमी झाली आह़े यातून गेल्या आठ वर्षात बाजाराची स्थिती कमकुवत झाली आह़े पारंपरिक शेतीत बैलांचे महत्त्व कायम असल्याने जिल्ह्यातील तळोदा आणि अक्कलकुवा येथील बैलबाजार आजही स्थान टिकवून असताना नंदुरबार बैल बाजाराची स्थिती कमकुवत झाल्याने त्यावर उदरनिर्वाह करणा:या व्यापा:यांचे आर्थिक गणित पुरते बिघडले आह़े बैलबाजारात बैलांची आवक होत नसल्याने शेतक:यांना जादा रक्कम खर्च करुन इतर शहरात जाऊन बैलांची खरेदी करावी लागत आह़े या बाजारातच विविध ठिकाणाहून चांगली क्षमता असलेले बैल विक्रीसाठी आल्यास शेतक:यांचा त्याला प्रतिसाद मिळणार आह़े नंदुरबार बाजार समितीत दर मंगळवारी भरवल्या जाणा:या बाजारात 1 जानेवारी ते 4 डिसेंबर या कालावधीत एकूण 675 बैलांची आवक झाली होती़ यातून केवळ 254 बैलांची विक्री झाली आह़े यातून 3 कोटी 65 लाख 5 हजार 900 रुपयांची उलाढाल झाली होती़ या बाजारात गावठी बैल येत नसल्याने उलाढीवर परिणाम झाल्याची माहिती आह़े केवळ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून बैल याठिकाणी विक्रीस येतात़ यंदाच्या वर्षात सर्वाधिक 45 हजार रुपये किमतीची बैलजोडी विक्रीस गेल्याची माहिती आह़े बाजार समिती सर्व प्रकारच्या सुविधा असल्या तरी बैलांची आवकच होत नसल्याने बैल बाजार इतिहास जमा होण्याकडे वाटचाल करत आह़े दर आठवडय़ाला आवक होणा:या 20 बैलांपैकी पाच ते सात बैलांची विक्री होत असल्याची स्थिती येथे निर्माण झाली आह़ेएकीकडे बैल बाजाराला घरघर लागली असताना दुसरीकडे शेळ्या आणि मेंढय़ाचा बाजार येथे तग धरुन आह़े नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी विक्रीसाठी आणले जाणारे बोकड, शेळ्या आणि मेंढय़ा ह्या गावठी वाणाच्या असल्याने त्यांची खरेदी करण्यासाठी गुजरात राज्यातील पशुपालक येथे हजेरी लावतात़ चालू वर्षात साधारण 1 हजार 100 शेळ्या-मेंढय़ांची विक्री झाल्याची माहिती आह़े आठवडय़ाला 200 शेळ्यांपैकी 180 शेळ्या ह्या तात्काळ विक्री होत असल्याने पशुपालक याठिकाणी न चुकता हजेरी लावतात़ सकाळी 8 वाजेपासून याठिकाणी शेळीवर्गीय पशु घेण्यासाठी व्यापारी गर्दी करतात़