शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या गौतमला पिंपर्डेकरांचा साश्रुनयनांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील सैन्य दलातील जवान गौतम रंगराव चव्हाण (मराठे) यांच्यावर शोकाकूल वातावरणात ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील सैन्य दलातील जवान गौतम रंगराव चव्हाण (मराठे) यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ सैन्य दलातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते़पिंपर्डे येथील गौतम चव्हाण हे सैन्य दलात जम्मू-काश्मिर राज्यातील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचे ह्रदयविकाराने निधन झाले होते़ २०१७ पासून चव्हाण हे सैन्य दलाच्या ५७ वायरलेस युनिटमध्ये कार्यरत होते़ चव्हाण हे दीड महिन्यापूर्वीच सुटी घेऊन गावी येऊन गेले होते़ त्यांचे लहान बंधू अमोल चव्हाण हे देखील सैन्यात आहेत़ दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाचे वृत्त गावात धडकताच गावावर शोककळा पसरली आहे़सकाळी गौतम चव्हाण यांचे पार्थिव पिंपर्डे येथे आणले गेल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता़ त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते़ फुलांनी सजविलेल्या ट्रालीतुन त्यांचे पार्थिक अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले़ पिंपर्डे गावालगतच्या अमरधाम परिसरातील शेतात चबुतरा तयार करुन पार्थिक अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते़यावेळी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, सैन्य दलाचे हवालदार नितीन चौधरी, हवालदार प्रशांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळ, पोलिस निरीक्षक नजन पाटील, सैनिक कल्याण विभागांचे रामदास पाटील, सरपंच शंकर वाघ, उपसरपंच अमोल मराठे यांनी पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली दिली़पोलीस प्रशासनाने हवेत तीन राऊंउ फायर करुन जवान चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले़ दरम्यान,शहीद जवान गौतम चव्हाण यांच्या पार्थिवावर टाकण्यात आलेला तिरंगा त्यांचे वडील रंगराव चव्हाण यांना सोपवण्यात आला़ जवान गौतम चव्हाण यांचा लहान भाऊ अमोल हा अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत आहे़ त्याला येण्यास उशिर होणार असल्याने चुलत भावाने अग्निडाग दिला़