शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाकडे धावणा:या शिवसैनिकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी घेतली होती. शिवसेनेचा हा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यात एकच असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी सातपुडय़ाकडे धाव घेतली होती. परंतु अखेरच्या टप्प्यातच पराभव झाल्याचे त्यांचा हिरमोड झाला.सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकुवा मतदारसंघात कॉँग्रेस व शिवसेनेमार्फत विजय मिळविण्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीतही तशी परिस्थिती दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेकडून आमशा पाडवी  हे एकमेव उमेदवार असल्याने या मतदार संघाची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी उत्सुकतेची शिवाय प्रतिष्ठेचीही ठरत होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या नजरा लागून होत्या. पहिल्या टप्प्यापासून शेवटर्पयत कॉँग्रेस व शिवसेनेने आघाडी घेतली. त्यानुसार मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही पक्षांमार्फत जल्लोष करण्यात येत होता. काही टप्प्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरही शिवसेनेने काही कालावधीत आघाडीच घेत अखरेच्या दोन टप्प्यार्पयत शिवसेनाच आघाडीवर राहिल्यामुळे विजय निश्चित असल्याचे समजून जिल्हाभरातील शिवसैनिक गुलाल, फटाके व अन्य साहित्य घेऊन अक्कलकुवा व धडगावकडे निघाले होते. परंतु शेवटच्या दोन टप्प्यात तोरणमाळ व असली या गटाची मतमोजणी झाल्यास कॉँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांनी आघाडी घेत विजयही मिळवला. त्यामुळे सर्व साहित्यानिशी सातपुडय़ाकडे रवाना झालेले शिवसैनिक नाराज झाले होते. काही वर्षापासून सुरु असलेल्या शिवसैनिकांनी समाजहितासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्यामुळे  पदाधिका:यांसह कार्यकत्र्यामध्ये हिरमोड झाल्याचे दिसून आले. 

मतमोजणीत शिवसेनेचे एकमेव उमेदवार आमशा पाडवी यांनी कमालीची आघाडी घेतली. त्यामुळे अतिदुर्गम भागातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्येही विजय निश्चित असल्याचे समजले. सेनेसाठी अनुकूल वातावरण दिसून आल्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश कार्यकर्ते त्या-त्या गावातील सर्वात उंच डोंगरांवर फटाक्यांसह पोहोचले. परंतु अखेरच्या टप्प्यातच शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास कॉँग्रेसने हिरावला. आपला उमेदवार पराभूत  झाल्यामुळे त्या शिवसैनिकांनी डोंगरांवर नेलेले फटाके न फोडताच शांततेत खाली उतरवले.