शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मागील भानगडीच्या वादातून दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 11:28 IST

18 जणांना अटक : वाहन व घरांचे नुकसान, नियंत्रणासाठी अश्रुधुराचा वापर

ठळक मुद्देपोलिसांकडून जबर लाठीमार.. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. आरोपींवर पोलिसांची दहशत बसावी म्हणून पोलिसांनीही जमावावर जबर लाठीमार केला. त्यामुळे वेळीच दंगल रोखण्यात यश आले. शिवाय रात्रीतूनच तीन अल्पवयीन बालकांसह 18 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना 11 सप्

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील भानगडीच्या वादातून शहरातील नवनाथ टेकडी भागात दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दगडफेक करण्यात आली. त्यात चार घरांचे व पाच वाहनांचे नुकसान झाले. जमाव आटोक्यात येत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे दोन नळकांडे फोडले. 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 11 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नंदुरबारातील नवनाथ टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीत गुरुवारी उत्तर रात्री ही घटना घडली. 21 रोजी या परिसरातील दोन गटात हाणामारी झाली होती. तेंव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. त्याचा उद्रेक गुरुवारी उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठय़ा, काठय़ा, दगड, विटांनी मारा केला. पाच वाहनांचेही नुकसान करण्यात आले. याशिवाय तीन ते चार घरांनाही या घटनेची झळ पोहचली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली, परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर अश्रुधुराच्या दोन नळकांडय़ा फोडल्या. त्यानंतर जमाव नियंत्रणात आला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या वसाहतीत अधिकचा बंदोबस्त तैणात केल्यावर शांतता झाली. यावेळी पोलिसांनी 19 जणांना अटक केली. त्यात वसीम अब्दुल रहिम बागवान, अब्दुल माजिद अब्दुल रेहमान, धमेंद्र प्रमल अहिरे, मुक्तार नबाब बागवान, शफीलाल मोहम्मद, आसिफ शाह लुकमान शाह फकिर, शाकीर हुसैन बागवान, रऊफ शेख मुसा मिस्तरी, कृष्णा आप्पा पेंढारकर, फरीद गुलाब बागवान, सलीम रफिक शाह, शुभम वामन जाधव, सुनिल भिमराव साळवे, पापा उर्फ मुस्तकीन राजू शाह, शाहरूख राजू शाह, ईस्माईल शाह शकुर शाह फकिर, कलीमखान बलदारखान बेलदार, मुक्तार भिकन शाह सर्व रा.बागवान गल्ली व आंबेडकर चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तीन अल्पवयीन संशयीत आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, शहर पोलीस निरिक्षक दीपक बुधवंत यांच्यासह वरिष्ठ अधिका:यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. याबाबत फौजदार आनंदा पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक बुधवंत करीत आहे.