शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

रोझवा प्रकल्पाची दुरुस्ती तात्काळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील रोझवा सिंचन प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील रोझवा सिंचन प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रकल्पात होणारा जलसाठा गळतीमुळे अल्पजीवी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघु सिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांची परिसरातील भूजल पातळी वाढण्यास महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यात रोझवा जलसिंचन प्रकल्पाची एकूण जलसाठवणूक क्षमता १.७४ दशलक्ष घनमीटर आहे तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.१७ दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर व सिंगपुर प्रकल्पाची २.१७ दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी होणाºया दमदार पावसामुळे हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असतात. मात्र या प्रकल्पांच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यांना लागलेल्या गळतीमुळे या प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु या सिंचन प्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे त्यातील जलसाठा हा अल्पजीवी ठरतो. मे अखेरपर्यंत यातील जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्पांनी तळ गाठला होता. या प्रकल्पांना असणाºया गळतीमुळे दरवर्षी हजारो लीटर पाणी वाहून जात असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.या प्रकल्पात असणाºया जलसाठ्यावर कोठारसह परिसरातील शेतकºयांच्या रब्बी व खरीप अंदाज अवलंबून असतो. परंतु या प्रकल्पांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊन प्रकल्पांचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णक्षमतेने शेतकºयांना वापर करता येत नाही. या प्रकल्पामधील जलसाठ्यांचे संवर्धन होणे अपेक्षित असताना त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे व त्यातील होणाºया पाण्याच्या गळतीकडे संबंधित विभागाचे सतत दुर्लक्ष असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरवर्षी या प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत असते. परंतु या प्रकल्पांच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. या लघु सिंचन प्रकल्पात होणारा पाणीसाठा वर्षभर टिकावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे.मागील १५ दिवसापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असणाºया या सिंचन प्रकल्प परिसरात दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने या प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या दुरूस्तीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली असताना या प्रकल्पांची गळती व दुरवस्था ‘जैसे थे’च असल्याने यात होणारा जलसाठा हा अल्पजीवी ठरणार आहे. पाऊस चांगला झाला तर दरवर्षी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात मात्र पाऊस कमी प्रमाणात झाला तर आहे तो जलसाठा टिकविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास उशीर आहे. तोपर्यंत तरी या प्रकल्पाची निदान डागडुजी करण्यात येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.गेल्या १५ दिवसापासून सातपुड्याच्या पर्वतरांगेत दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे या लघुसिंचन प्रकल्पात पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. परंतु या सिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा होण्यासाठी अद्यापतरी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. या प्रकल्पात होणाºया जलसाठ्यावरच शेतीची पुढील समीकरणे अवलंबून असतात. सातपुड्याच्या पायथ्याशी कोठरसह अन्य भागात शेती करणाºया शेतकºयांसाठी हे प्रकल्प संजीवनी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.