दरम्यान, लाभार्थी ज्या वेळेस चौकशीसाठी येतो तेव्हा संबंधित दुकानदार कधीचे धान्य वाटप झाले असून, आपण वेळेत माल घेण्यासाठी आले नाहीत, असे सांगून वेळ मारून नेतात.
या प्रकारामुळे लाभार्थ्यांस त्याच्या हक्काचे धान्य न मिळताच दुकानदार परस्पर त्याची विल्हेवाट लावत असल्याचेही लाभार्थ्यांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या गैरप्रकरास आळा घालावा, अशी मागणी होत आहे. तसेच संबंधित दुकानदारांना वेळेत धान्यसाठा उचलण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच जे वेळेत धान्य साठा उचलणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सद्य:स्थितीत लॉकडाऊन सुरू असून, सर्वच व्यवहार ठप्प असल्याने अशा परिस्थितीत तरी प्रत्येक लाभार्थ्यास त्याच्या हक्काचे धान्य वेळेत देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.