शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

रोटरीच्या मानवतेच्या दिवाळीने भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:05 IST

भोणे रोड वसाहतीतील कार्यक्रम : दीडशे कुटुंबांची घरे रंगाने चकाकली

नंदुरबार : ‘वैष्णव जन तो तेने कहिये,  जे पीड परायी जाणे रे..’ महात्मा गांधींच्या या लोकप्रिय भक्तीगिताच्या उक्तीप्रमाणे येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने भोणे रस्त्यावरील आदिवासी हट्टीत मानवतेची दिवाळीचा आगळा वेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमाने ग्रामस्थांच्या चेह:यावर दिवाळीचा खरा आनंद पाहायला मिळाला.नंदुरबार शहरातील भोणे रस्त्याला लागून साधारणत: दीडशे कुटुंब निवासाला असलेली आदिवासी हट्टी आहे. या हट्टीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे यंदाची दिवाळी साजरा करण्यात आली. त्यासाठी दोन दिवसापासूनच या हट्टीत रोटरीच्या पदाधिका:यांनी तेथील कुटुंबांशी जवळीक साधून त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रय} केला. त्यासाठी सर्व घरांच्या दर्शनी भागात रंगरंगोटी केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांच्या सोबत दिवाळी साजरा केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उद्योगपती देवेंद्र जैन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, सचिव प्रितेश बांगड, मदनलाल जैन, नीलेश तवर हे उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले की, धडपड व सेवेचा ध्यास असणारी लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चळवळीला गती येते. त्याची प्रचिती रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला पाहून येते. या वेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमांतर्गत रोटरी नंदनगरीतर्फे भोणे फाटा परिसरातील वसाहतीतील गरीब कुटूंबाच्या 130 घरांना रंगकाम करुन दिले. तसेच घरोघरी जावून आरोग्य तपासणी करुन 300 विटॅमीन व कॅल्शीयमची औषधी देण्यात आली. तसेच दिवाळीसाठी मिठाई, फराळ व चॉकलेट घरोघरी वाटप करण्यात आले. 500 पेक्षा अधिक महिलांना साडय़ा तसेच लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. तेथील विद्याथ्र्याना 500 जोडी चप्पलही वाटप करून 500 जणांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी उपक्रमास सहकार्य करणारे डॉ.विशाल चौधरी, मनोज गायकवाड, मनिष बाफणा, शैलेश जाधव, युनुसभाई सैय्यद, गिरीष जैन, हर्षद मेमन यांचा जिल्हाधिका:यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष शब्बीर मेमन यांनी केले. सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर तर आभार जितेंद्र सोनार यांनी मानले. कार्यक्रमासाठी क्लबचे सदस्य नीलेश तवर, वसंत रावल, इसरार सैय्यद, हाकीम लोखंडवाला, नंदु सोनी, जय गुजराथी, दिनेश साळुंखे, अॅड.प्रेमानंद इंदिस, राजनसिंग चांदेल, कैलास मराठे, अपूर्व पटेल आदींनी परिश्रम घेतले.