रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० च्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला २०१९-२० या वर्षाचा ‘बेस्ट क्लब गोल्ड ॲवार्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासोबतच विविध आठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात पब्लिक इमेज प्लॅटिनम ॲवार्ड, सर्विस प्रोजेक्ट प्लॅटिनम ॲवार्ड, एडल्ट लिटरसी सिल्वर ॲवार्ड, मेंबरशिप सिल्वर चाईल्ड डेव्हलपमेंट ॲवार्ड, इंटरनॅशनल सायटेशन ॲवार्ड, क्लब स्पॉन्सरशिप ॲवार्ड व मेंबरशिप ॲवार्ड या पुरस्कारांचा समावेश आहे.
बडोदा येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर कमल सिंघवी, मनोज देसाई, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, फर्स्ट लेडी हिता जैन, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिश शाह, आशिष अजमेरा, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नेक्स्ट संतोष प्रधान, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट श्रीकांत इंदानी, निहीर दवे आदी उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० च्या १०५ क्लबमधून हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार या क्लबला देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे नीलेश तंवर यांना २०१९-२० या वर्षाचा ‘बेस्ट असिस्टंट गव्हर्नर प्लॅटिनम अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार तत्कालीन अध्यक्ष प्रीतिश बांगड, नागसेन पेंढारकर, माजी असिस्टंट गव्हर्नर नीलेश तंवर, सचिव मनोज गायकवाड, सय्यद इसरार अली आदींनी स्वीकारले.