शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘रॉज रींग प्याराकीट’चा प्रकाशात जाणवतोय अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:42 IST

प्रकाशात मोठी संख्या : पक्षीप्रेमींमध्ये समाधान, सातत्याने होत होती घट

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा येथील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पोपट जातीतील ‘रॉज रींग प्याराकीट’ जातीच्या नर-मादींचा अधिवास निसर्गप्रेमींना जाणवत आह़े या पक्षाची प्रजात सर्वसामान्य गटात मोडण्यात येत असली तरीही प्रकाशा येथे  सध्या यांची मोठी संख्या पक्षीप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आह़े  ‘रॉज रींग प्याराकीट’ हा पोपट जातीतील पक्षी असून तो दिसण्यास हिरवा रंगाचा असतो़  त्याच्या माने जवळ लाल रंगाचे काळपट वलय असत़े कळप करुन राहणे या पक्षाला अधिक पसंत असल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगण्यात आल़े  सध्या तापी काठावर या पक्षांचा मोठय़ा प्रमाणात वावर दिसून येत आह़े  तळोदा येथील पक्षी अभ्यासक ए.टी.वाघ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हा प्याराकीट जातीचा पक्षी सर्वसाधारणपणे आढळत असला तरी जिल्ह्यात गेल्या काही  वर्षापासून याची संख्या घटत जात आह़े नर जातीच्या पक्षाला मानेभोवती गुलाबी रंगाचे वलय असते. मादीला काळ्या रंगाचे वलय असत़े मिरची, पेरू, भात आदी आवडीचे खाद्य पदार्थ आहेत़ या पक्षाचे वजन 95 ते 140 ग्रॅम इतके असू शकते. याची लांबी 38 ते 42 सेंटीमीटर इतकी असू शकत़े बोलायचे म्हटल्यास साधारणत: अडीचशे शब्द बोलण्याची या पक्षाची क्षमता आह़े ‘रॉज रींग प्याराकीट’ हा पोपट जातीतील पक्षी शेडय़ुल चारमध्ये  समाविष्ट होत असतो़ त्याला पाळण्यास किंवा बंदिस्त करुन ठेवल्यास हा गुन्हादेखील ठरु शकतो़ प्रकाशा येथे या पक्षाचा अधिवास जाणवू लागला असल्याने पक्षीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झालेले आहेत़तापी काठावर पक्षांचे कळप दिसू लागले आह़े पूर्वी क्वचितच दिसणारा हा पक्षी आता मोठय़ा संख्येने दिसू लागत आह़े हे पक्षी नेमके कोठून आले, या मागे काही विशेष कारण आहे काय? याचा शोध पक्षीप्रेमींकडून घेण्यात येत आह़े या पक्षाची जात कमी होत चालली असल्याने त्यांचे संवर्धन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितल्यानुसार या प्याराकीट पक्षाचा वापर हा पूर्वी भविष्य वर्तविण्यासाठी करण्यात येत होता़ परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पक्षांना बंदिस्त करुन ठेवणे शिक्षा व दंडास पात्र असल्याने या पक्षांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याचा अंदाज व्यक्त होत आह़े भविष्य वर्तविण्यासाठी या पक्षाचा वापर करण्यात येत असल्याने सातत्याने यांची संख्या घटत होती़