शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भुरटय़ा चोरांच्या उपद्रवाने प्रकाशा ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 13:00 IST

पुष्पदंतेश्वर मंदिरात तिस:यांदा चोरी : शेतक:याच्या ट्रॅक्टरमधून डिङोलही लंपास

प्रकाशा : भुरटय़ा चोरांचा प्रकाशा येथे सुळसुळाट झाला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सोमवारी रात्री येथील पुष्पदंतेश्वर मंदिराचे लोखंडाचे दोन दरवाजांचे कुलूप तोडून चोरटय़ांनी गाभा:यातील मोठय़ा आकाराची चांदीची मूर्ती, चार मोठे घंटे, गळती आदी वस्तू चोरुन नेल्या तर एका शेतक:याच्या ट्रॅक्टरमधून 40 लीटर डिङोल चोरीस गेल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस  उंचावर पुष्पदंतेश्वर मंदिर आहे. या मंदिरावर याआधीही तीनवेळा इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरीला गेली आहे. या घटनेला तीन महिने झाले नाही तोच सोमवारी रात्री         पुन्हा मंदिराच्या दोन्ही लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून गाभा:यातील चांदीची मोठय़ा आकाराची पाच ते सात किलो वजनाची नागाची मूर्ती, लहान-मोठे चार घंटे, तांब्याची गळती आदी वस्तू चोरुन नेल्या. तोडलेले कुलूपही चोरटय़ांनी सोबत नेले. हा प्रकार सकाळी पुजारींच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मंदिरात चोरी होऊ नये          म्हणून गाभा:यात दोन महिन्यापूर्वीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता.दुसरी घटनेत चोरटय़ांनी ट्रॅक्टरमधील 40 लीटर डिङोल लंपास केले.  गावातील तोताराम महाराज मंदिराजवळील रहिवासी सतीश भगवान चौधरी यांच्या घरासमोर ट्रॅक्टर उभे होते. सकाळी शेतात जावे लागते म्हणून ट्रॅक्टरच्या टाकीत डिङोल           फुल भरून ठेवले होते. त्यात 40 लीटरपेक्षा जास्त डिङोल होते. चोरटय़ांनी टाकीची नळी कापून ते चोरुन नेले. ही घटनादेखील त्यांच्याकडे दुस:यांदा  घडली आहे. पहिल्या घटनेला महिनादेखील         झाला नाही. दीड महिन्यापूर्वी गावातील गुप्तेश्वर मंदिरामागून नवी जीप चोरीची घडना घडली होती.           त्या जीपचा अद्यापही तपास लागलेला नाही. गावात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मंदिर परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे कसून शोध घेतला तर नक्कीच धागेदोरे हाती लागतील यात शंका नाही.प्रकाशा गाव  व परिसरात भुरटय़ा चोरांनी धुमाकूळ घातला असून वारंवार चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून येथे पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून येथील दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचा:यांची संख्या वाढवून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.