शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराने मुरुमची वाहतूक केल्याने रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:54 IST

बांधकाम विभागाचीच रस्ते महामंडळाकडे तक्रार

शहादा : मनरद, शिरुड व वर्ढे टेंभा या नूतनीकरण झालेल्या रस्त्यावर अवजड वाहतूक करून रस्त्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या ठेकेदारावर कारवाई करुन दुरवस्था झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी शहादा बांधकाम विभागानेच रस्ते विकास महामंडळकडे लेखी तक्रार केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुक्यातील मनरद, शिरुड, टेंभा या रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम नुकतेच झाले आहे.  या रस्त्यावरून विसरवाडी ते खेतिया या रस्त्याचे काम करणा:या ठेकेदाराने 55 ते 60 टन वजनाची ओव्हरलोड वाहने चालवत रस्त्याची दुरवस्था केली आहे. हा रस्ता बनविणारे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या        ठेकेदारात यावरून जोरदार            शाब्दीक चकमक झाली होती. हायवेच्या ठेकेदाराने रस्ता पुन्हा       दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह मनरद रस्ता तयार करणा:या ठेकेदाराने केली होती. मात्र हायवेच्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती तर दूरच राहिला उलट त्याच्या माणसाने ठेकेदाराच्या एका माणसाला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्या घटनेसंदर्भात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार मारहाण झालेल्या तक्रारदाराने दिली होती. मात्र पोलिसांनी अजूनही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  मात्र आता शहादा बांधकाम विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास याविरोधात मनरद, शिरुड व वर्ढेटेंभा या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिरूर दिगर ते म मनरद व शिरुड ते वर्ढेटेंभा  या दोन रस्त्यांचे काम  करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही रस्ते खराब झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतक:यांनी या दोन्ही रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार या कामासाठी सुमारे आठ वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय ठेकेदाराकडून या दोन्ही रस्त्याचे काम केले होते. 29 व 30 डिसेंबरला या दोन्ही रस्त्यांच्या नूतनीकरणासह डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. हे दोन्ही रस्ते साधारण दहा-बारा टन वजन असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ग्रामीण भागात तयार करण्यात आला  होता.            मात्र महामार्गाचे काम करणारा  ठेकेदार या रस्त्यावरून मुरुमची वाहतूक करीत आहे. सुमारे 50 ते 60 टन वजन असलेल्या दिवसातून डंपरच्या 40 ते 50 फे:यांमुळे या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या ठेकेदाराने मनरद, शिरुड, टेंभा या रस्त्याचे रस्त्याचे काम नव्याने करून द्यावे, अशी मागणी  राष्ट्रवादी           काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलाता शितोळे, ठेकेदार पंडित जाधव, जयदीप           गिरासे, दिनेश पाटील, जहीर खान बेलदार केली आहे. ग्रामीण         भागातील रस्त्यांवर अवजड वाहतूक करून मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास याविरोधात मनरद, शिरुड व वर्ढेटेंभा या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.