तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा : केंद्र शासनाने तात्काळ शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावे, शेतीमालाला किफायतशीर दीडपट भाव देण्याबाबत सुधारित कायदा करावा, २०२० वीज विधेयक ताबडतोब रद्द करावे, शेतकऱ्यांवरील खोट्या केसेस मागे घ्याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर शेतमजूर युनियनचे धुळे- नंदुरबार जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष सुनील गायकवाड, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे, उत्तम पवार, भिका ब्राम्हणे, जितेंद्र पवार, राजू पवार, नईम सैयद, दिनेश गुलाले, शोभा गायकवाड, रेशमबाई ईशी, दीपक मोहिते, दिनेश पेंढारकर, कमल गायकवाड, उखा पेंढारकर, प्रताप ठाकरे, मानसिंग पवार, रवींद्र पवार, कृष्णा ठाकरे आदींची स्वाक्षरी आहे.
या रास्ता रोको आंदोलनामुळे शहादा-दोंडाईचा रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी १०० आंदोलकांना अटक करून सोडले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.