शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला थेट कारवाईचे अधिकार : नंदुरबार अपंग युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:29 IST

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरण ह्यलोकमतह्णने लावून धरल्याने आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याने शासन स्तरावरही हालचाली गतिमान झाल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग व शिक्षण उपसंचालकांनी आठवडाभरात दोन तातडीचे पत्र काढले आहेत. 2010 नंतर शासनाने समायोजनाचे कुठलेही आदेश दिलेले ...

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरण ह्यलोकमतह्णने लावून धरल्याने आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याने शासन स्तरावरही हालचाली गतिमान झाल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग व शिक्षण उपसंचालकांनी आठवडाभरात दोन तातडीचे पत्र काढले आहेत. 2010 नंतर शासनाने समायोजनाचे कुठलेही आदेश दिलेले नसल्याचे या दोन्ही अध्यादेशात स्पष्ट करण्यात येवून थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्हा परिषदेत सहा महिन्यात 71 जणांना सामावून घेण्यात आल्याचे उघड झाले. त्यातील 31 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यामुळे शासन, प्रशासन स्तरावर खळबळ उडाली. या प्रकरणाची व्याप्ती राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असल्याची शक्यता त्यातून वर्तविण्यात आली. त्या अनुषंगाने धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, गडचिरोली जिल्ह्यात संशयीतरित्या समायोजन झाल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेतील या प्रकरणाचा ह्यलोकमतह्णने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालकांनीही दखल घेतली आहे. या विभागातील अधिका:यांच्या नावेच बनावट नियुक्तीपत्र निघाल्याने विभागाने कडक पाऊले उचलली आहेत. आठवडाभरात दोन वेगवेगळी पत्रे शासनातर्फे काढण्यात आले आहेत.17 फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभागाने समायोजनाबाबत 15 सप्टेंबर 2010 रोजी अध्यादेश काढलेला होता. त्यानुसार 1 मार्च 2009 पासून केंद्रीय अपंग एकात्म शिक्षण योजना बंद झाली असल्याने त्या दिनांकानंतर नियुक्त झालेल्या विशेष शिक्षक, परिचर यांना सामावून घेवू नये. 2010 नंतर खाजगी संस्थांना नव्याने अपंग युनिट मंजुर करू नये असेही यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदांनी ग्राम विकास विभागाकडून प्राप्त होणा:या आदेशावर परस्पर कार्यवाही करू नये. ग्राम विकास विभागाने शालेय शिक्षण विभागाचा अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचेही यात नमुद करण्यात आले आहे. अध्यादेशावर कक्ष अधिकारी नि.पो.थोरात यांची सही आहे.शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी काढलेल्या पत्रात पुन्हा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, अपंग युनिट योजनेअंतर्गत शासनाच्या बनावट/खोटय़ा पत्रांच्या आधारे नियुक्ती देण्याबाबत प्रकार उघडीस आला आहे. 15 सप्टेंबर 2010 च्या शासन निर्णयान्वये त्यानंतर कोणत्याही विशेष शिक्षक/परिचरांचे समायोजन करण्याबाबतचे पत्र शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले नाही. जर विशेष शिक्षकांच्या समायोजनाची पत्रे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांना प्राप्त झाली असल्यास ती खोटी/बोगस असल्याचे गृहीत धरून त्याचा विचार करू नये. यापूर्वी त्याचा विचार झाला असेल तर संबधीत शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येवून त्यांच्यावर तडकाफडकी फौजदारी गुन्हा दाखल करावा असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभाग ह्यदेर आये दुरूस्त आयेह्ण अशीच प्रतिक्रिया जि.प.वतरूळात आहे.