शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सव्र्हर डाऊनमुळे परवानगीसाठी फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठी गरबा मंडळांनी पोलीस ठाण्याकडून ऑनलाईन परवानगी घेण्याची सूचना संबंधित गरबा मंडळांना दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठी गरबा मंडळांनी पोलीस ठाण्याकडून ऑनलाईन परवानगी घेण्याची सूचना संबंधित गरबा मंडळांना दिली असली तरी सव्र्हर डाऊनमुळे त्यात खोळंबा येत आहे. परवानगीसाठी सातत्याने मंडळाच्या पदाधिका:यांना पोलीस ठाण्याकडे फिरफिर करावी लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपल्याने व जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी करीता ऑफ लाईन अर्ज स्विकारण्याची सूचना संबंधीत पोलीस ठाण्यांना द्यावी, अशी गरबा मंडळांची मागणी आहे.संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध असलेल्या नवरात्रोत्सवास 29 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून होत आहे. साहजिकच या निमित्ताने गरबा, रास दांडियाचीदेखील तरूण-तरूणींमध्ये लगबग सुरू झालेली आहे. यासाठी वाजंत्रीची आवश्यकता भासत असल्यामुळे पोलीस ठाण्यांची गरबा मंडळाने अधिकृत परवानगी घेण्याची सूचना पदाधिका:यांना केली आहे. गणेशोत्सवात पोलीस ठाण्यांनी गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगीची सक्ती केली होती. याच धर्तीवर गरबा मंडळांनीही ऑफलाईन परवानगीचा अर्ज न करता ऑनलाईन परवानगी घेण्याची सूचना केली आहे.तळोदा पोलीस ठाण्यानेही मंडळांना ऑनलाईन परवानगी घेण्याचे सूचित केले आहे. तथापि या ऑनलाईन नोंदणीत सातत्याने सर्वर डाऊनने खोळंबा घातला आहे. कारण जेव्हा गरबा मंडळाचे पदाधिकारी संबंधित संगणक केंद्रात ऑनलाईन नोंदणीसाठी जातात तेव्हा सव्र्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते. तास न तास पदाधिका:यांना केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत असते. एवढे करूनही नोंदणी होत नसल्याचे पदाधिकारी सांगतात.मंडळाच्या नोंदणीसाठी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत संगणक केंद्राकडे हेलपाटे मारीत असल्याची व्यथा काही महिला पदाधिका:यांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक नवरात्रोत्सवात अबाल वृद्धांबरोबरच तरूण-तरूणींमध्ये मोठे आकर्षण असते. साहजिकच उत्सवासाठी शौकीन दांडीया प्रेमी 15 दिवसांपासून तयारी करीत असतात. शिवाय सुरत, इंदोर, अहमदाबाद येथून स्पेशल दांडीयाचा ड्रेसदेखील आणून ठेवला आहे, अशी परिस्थिती असतांना ऑनलाईन परवानगीची सक्ती पोलीस ठाण्यांनी घातल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे हा उत्सव अगदी दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. असे असतांना अजूनही गरबा मंडळांना पोलीस ठाण्याचे परवानगी मिळालेली नाही. परिणामी गरबा प्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. ऑनलाईन नोंदणीचा परिणाम गरबा मंडळाच्या संख्यांवरही होणार असून, जिल्हा पोलीस प्रशासनाने याप्रकरणी  गंभीर दखल घेऊन ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल करून ऑनलाईन अर्जाने परवानगी स्विकारावी, अशी गरबा प्रेमी व पदाधिका:यांची अपेक्षा आहे. दरम्यान, ऑनलाईन नोंदणीबाबत येथील पोलीस ठाण्यामध्ये संबंधीतास विचारले असता ऑनलाईन नोंदणीची सूचना वरिष्ठांकडूनच देण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.  आता पावेतो शहरातून दोनच गरबा मंडळांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.