लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी केले़ पालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते़मुकेश सारवान यांनी घेतलेल्या या बैठकीत सफाई कर्मचाºयांच्या कालबद्ध पदोन्नती कार्यक्रम, निवास व्यवस्था तसेच नोकरीतील अडचणी सोडवण्याबाबत उपस्थित पालिका मुख्याधिकाºयांना सूचना केल्या़ यावेळी सभापती कुणाल वसावे, कैलास, पाटील, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, प्रीतम ढंढोरे उपस्थित होते़ सारवान यांच्या उपस्थितीत मेहतर समाजाची बैठकही विश्रामगृहात घेण्यात आली़
सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:47 IST