शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल आयुक्तांनी घेतला विविध योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान व महसूल कर वसुलीसंदर्भात विभागीय आयुक्त आर.आर.माने यांनी गुरुवारी आढावा घेतला. मार्च अखेर ही सर्व कामे पुर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी अधिका:यांना दिले.विभागीय महसूल आयुक्त आर.आर.माने गुरुवारी नंदुरबारात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी महसूलचे उपायुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान व महसूल कर वसुलीसंदर्भात विभागीय आयुक्त आर.आर.माने यांनी गुरुवारी आढावा घेतला. मार्च अखेर ही सर्व कामे पुर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी अधिका:यांना दिले.विभागीय महसूल आयुक्त आर.आर.माने गुरुवारी नंदुरबारात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी महसूलचे उपायुक्त दिलीप स्वामी, रोहयोचे उन्मेश महाजन, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे यांच्यासह           विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आयुक्त माने यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. मार्च अखेर उद्दीष्टपुर्ती कशी होईल यासाठी प्रयत्न करावा. आलेला सर्वच निधी खर्च करण्याकडे कल असू द्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. शिवारफेरीसारख्या उपक्रमातून अभिलेखांचे उपलब्ध अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्याने अद्ययावतीकरण करून ते अचुकपणे तयार करावे. सातबारा संगणकीकरणाचे काम जलदगतीने पुर्ण करावे. कुळ कायद्यांमध्ये झालेल्या सुधारणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकानिहाय शिबिर घेण्यात यावे यासह त्यांनी इतर विविध बाबींचा आढावा घेत मार्गदर्शन    केले.उपायुक्त स्वामी, महाजन यांनी देखील मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी महसूल वसुलीबाबत नियोजनाची माहिती दिली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे,  सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, देवदत्त केकाण, लक्ष्मीकांत साताळकर, धर्मेद्र जैन, नितीन पाटील, मनोज खैरनार, प्रमोद वसावे, योगेश चंद्रे, नितीन  देवरे, शाम वाडकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित  होते.