शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर पुनर्वसनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर पुनर्वसन गावठाण आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक अफरोज अहमद यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर पुनर्वसन गावठाण आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक अफरोज अहमद यांनी महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभागातील अधिका:यांच्या उपस्थितीत आढावा घेतला.यावेळी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, जमीन समतलीकरण, अनुदान वाटप, प्रकल्पबाधितांचे स्थलांतर, सिंचन सुविधा देणेबाबत, गांवठाण विस्तार, नागरी सुविधा उन्नतीकरण, आरोग्य सुविधा, मुळ गांवातील व पुनर्वसन गांवठाणातील शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, वनसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, साव:यादिगर बिलगांव रस्ता व पूलाचे बांधकामाबाबत संबंधित विभागांकडून झालेल्या कामांबाबत माहिती देण्यात आली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी सरदार सरोवरच्या ठिकाणी वस्ती करुन राहत असलेली कुटुंबे धोक्याच्या ठिकाणापासून लांब वस्ती आहे याची खात्री करुन घ्यावी. तसेच पुनर्वसन वसाहतीजवळ मुलांच्या शिक्षणासाठी शाळा असाव्यात, असे अहमद यांनी सांगितले. सरदार सरोवर प्रकल्पाबाबत संबंधित विभागांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर पुनर्वसन, शाळा, आरोग्य अशा महत्वाच्या विषयांकडे लक्ष देऊन आवश्यक कामे कालमर्यादेत करावी, असे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी (ससप्र),दत्तात्रय बोरुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा कृषी अधिक्षक बी. एन. पाटील, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे, उपवनसंरक्षक एस. बी. केवटे, उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते.