शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात मनरेगा कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कापूस खरेदी प्रक्रियेला वेग देऊन दररोज १०० वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कापूस खरेदी प्रक्रियेला वेग देऊन दररोज १०० वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. त्यानंतर शहादा येथे झालेल्या बैठकीत मनरेगाच्या कामांचा आढावा घेतला.शहादा येथील कापूस खरेदी केंद्र आणि कॉटन मीलला जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी गुरुवारी भेट दिली. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी आदी होते.जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाचे सर्वेक्षण करण्यात यावे. शेवटच्या शेतकºयाचा कापूस खरेदी होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू ठेवावी. योग्य नियोजन करून खरेदी प्रक्रीयेला वेग देण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन आडत व्यापाºयांशी चर्चा केली. शहादा येथे झालेल्या बैठकीत मनरेगा योजनेचा आढावा घेतला. शेतकºयांचे ग्रुप करून कंपार्टमेंन्ट बंडींगची कामे घेण्यात यावी. सीसीटीची कामे घेताना सोबत वृक्षारोपणाची कामे घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. प्रकाशा व तलावडी येथे ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्या समन्वयाने मजुरांना काम उपलब्ध करून दिल्याने बैठकीत त्यांनी कौतुक केले. मानमोडे आणि भुलाणे येथील कामांना डॉ.भारुड यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते मजुरांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. स्थानिक प्रशासनाने या टोप्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या वेळी वनक्षेत्रपाल अनिल पवार, गटविकास अधिकारी गोसावी, वनपाल एस.एस. देसले, वनपाल प्रवीण वाघ, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच शांताराम खर्डे, मलगाव येथील सरपंच शांताराम पावरा उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा केली. कोविड संकटानंतर शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांचे चांगले सहकार्य घेता येईल. संकट आणखी काही काळ चालणार असल्याने स्वयंसेवकांनी उत्साह कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.भारुड यांनी नगरपालिकेलाही भेट देऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेतला.