शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

सात ग्रामपंचायतींचे निकाल उत्कंठावर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यात प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया झालेल्या सात ग्रामपंचायतींचा निकाल जाहिर झाला आहे. यात चार ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया झालेल्या सात ग्रामपंचायतींचा निकाल जाहिर झाला आहे. यात चार ठिकाणी शिवसेना तर तीन ठिकाणी भाजप पुरस्कृत पॅनल विजयी ठरले आहेत. तालुक्यात २२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर मुदतीअंती १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यातून सात ठिकाणी निवडणूक कार्यक्रम पुढे सुरु राहिला. तालुक्यातील भालेर, कोपर्ली, हाटमोहिदे, कंढरे, भादवड, वैंदाणे आणि कार्ली या सात ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदानाची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी सहा टेबलवर सुरु करण्यात आली. दोन फे-यांमध्ये सर्व निकाल समोर आले होते. विजयी झालेले उमेदरवार पुढीप्रमाणे कंढरे ग्रामपंचायतीत शरद गुलाब भिल, मनिषा गुलाब भिल, संगीता लोटन भिल, अंकुश अवचित पाटील, विद्या पंकज पाटील, रामकृष्ण अशोक पाटील व पुष्पाबाई रमेश पाटील हे विजयी झाले. हाटमोहिदे ग्रामपंचायतीत श्रावण धर्मा भिल, यमुनाबाई उदेसिंग भिल, मनिषा भरत कोळी,  दुला धवळू भिल, गजराजसिंग महेंद्रसिंग जमादार, सुनिताबाई सुनील भिल, दिपक साहेबराव भिल, मनिषा रतीलाल भिल, अश्विनी किशोर पाटील हे उमेदवार विजयी झाले. भादवड ग्रामपंचायतीत योगेश भटू पाटील,  कलाबाई सुरसिंग भिल, मंगला सुभाष पाटील, राजेंद्र मुकेश पाडवी, युवराज रामदास पाटील, मंगलाबाई जयसिंग राजपूत, अशोक नवल पाटील, सविता चंद्रकांत पाटील, आशाबाई मुरलीधर पाटील हे विजयी झाले. वैंदाणे ग्रामपंचायतीत ईश्वर शामराव पिपंळे, मच्छिंद्र नाना भिल, सरला संजय पाटील, रत्नाबाई संजय भिल, प्रविण उत्तम पवार, सुनंदा सुदाम धनगर, मनोज रविंद्र राजपूत, ज्योतीबाई हिरालाल पाटील हे उमेदवार विजयी झाले. कार्ली ग्रामपंचायत निवडणूकीत धारसिंग महारु भिल, आशाबाई देविसिंग भिल, ज्योतीबाई रविंद्र पाटील,  पूनम महेंद्र पाटील, विमलबाई गोरख पाटील, प्रल्हाद धनराज पाटील, शेवंताबाई गैंधल भिल, सुरेखा भाऊसाहेब पाटील हे विजयी झाले. भालेर ग्रामपंचायतीत पंडीत आंबेसिंग भिल, दिपाली पावबा भिल, हिरामण दगा पाटील, वैशाली दिनेश पाटील, जिजाबाई आनंदा पवार, गजानन भिका पाटील, कविता चंद्रशेखर पाटील, शोभा प्रल्हाद पाटील, पुरूषोत्तम कैलास पाटील, सुमनबाई वल्लभ भिल हे विजयी झाले. कोपर्ली ग्रामपंचायत निवडणूकीत माखूबाई युवराज वळवी, प्रकाश तुमडूसिंग गिरासे, ज्योतीबाई विनोद वानखेडे, विनोद रमण वानखेडे, जुलेखाबी रऊफ खाटीक, नलिनी महेंद्रलाल गुजराथी, अरुण भिका अहिरे, मंगलाबाई रविंद्र पवार, राजेंद्र मधुकर पवार, नजूबाई संजय भिल व वंदनाबाई दत्तू भिल हे विजयी झाले. १२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या- ॲड. राम रघुवंशी  तालुक्यातील २१ पैकी १२ ग्रामपंचायतींवर शिवसेने दावा केला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी पत्रक काढून हा दावा केला आहे. शिवसेनेने दावा केलेल्या ग्रामपंचायतीत विखरण, काकर्दा, आराळे, निंभेल, कंढरे, भादवड, कार्ली, शिंदगव्हाण, तिलाली, हाटमोहिदे, बलदाणे, खोक्राळे या १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान याबाबत जि.प उपाध्यक्ष ॲड. रघुवंशी यांनी दिलेल्या पत्रकात शिवेसेनेतर्फे विजयी झालेल्या ग्रामपंचायती व पॅनलप्रमुखांची नावे शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहेत. ग्रामीण भागात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जनता खुश असल्याचे यातून स्पष्ट होत असून यापुढेही शिवसेना ग्रामीण भागात याचप्रकारे काम करेल असे म्हटले आहे.

ईश्वर चिठ्ठीने निर्णय  भादवड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये योगेश भटू राजपूत व संजय नवलसिंग राजपूत या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २२२ मते मिळाली होती. दोघांना सारखी मते मिळाल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. १० वर्षीय बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आल्चयानंतर योगेश राजपूत हे विजयी झाले.