शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुलासाठी ग्रामस्थांचे खासदारांकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:35 IST

खेडले ते पिसावर : छोटा धनपूर ते मोड रस्ता दुरुस्तीची मागणी

बोरद : खेडले ते पिसावर दरम्यान गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यातील 22 खेडय़ांना जोडणा:या पुलाचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी खासदार डॉ़ हीना गावीत यांच्याकडे केली आह़े हा पुल तयार केल्यास 22 गावातील ग्रामस्थांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आल़े याबाबत डॉ़ गावीत यांना मोड येथील ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात येऊन पुलाबाबत पाठपुरावा करावा असे साकडे घालण्यात आले आह़े सातपुडय़ाच्या कुशित असलेल्या जुवानी, धजापाणी, लाखापूर, मालदा, तुळाजा, करडे, छोटा धनपूर, न्युबन ही अतिदुर्गम भागात मोडली जाणारी महाराष्ट्राच्या हद्दीतील गावे तसेच गुजरात राज्याच्या हद्दीतील पिसावर, उभद, लिंबारा, सदगव्हाण आदी सिमेवरील गावे अशी एकूण 22 गावांना या पुलाचा फायदा होणार आह़े त्याच प्रमाणे पुलाअभावी ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबण्यासही यानिमित्ताने मदत होणार आह़े नाल्यावरील पुल तुटल्याने 23 किमी अंतराचा वळसा घालून नंदुरबार व शहादा तसेच विविध गावांना जावे लागत आह़े त्यामुळे वेळ व पैसा दोघांचाही अपव्यय होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आह़े सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आह़े छोटा धनपूर ते मोड, कळमसरे, मोहिदा आदी विविध रस्त्यांची मोठय़ा  प्रमाणात दुरावस्था झाली आह़े त्यामुळे येथील ग्रामस्थांसह विद्याथ्र्याना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आह़े पावसाळा असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान, देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच जयसिंग माळी, गुलाबसिंग गिरासे, पुरुषोत्तम चव्हाण, दिलीप पाटील, दिलीप चौधरी, ब्रिजलाल चव्हाण, भिमा चौधरी, किशोर पाटील, दिगंबर चव्हाण, काशिनाथ चौधरी, संजय चौधरी, डॉ़ नंदकिशोर चौधरी, डॉ़ छोटू चौधरी, आनंद चौधरी आदींच्या स्वाक्ष:या आहेत़