शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बंधा-यातील पाण्यासह आसाणे ग्रामस्थांचेही डोळे पाण्याने डबडबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:38 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती बांधांमध्ये साठलेल्या पाण्याचे.नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग अर्थात आसाणे, घोटाणे, न्याहली, रनाळे हा भाग नेहमीच अवर्षण प्रवण. तालुक्यातील एकुण पावसाच्या तुलनेत या भागात सरासरी केवळ 40 ते 45 टक्के पाऊस पडतो. परिणामी शेती उत्पन्न तर नाहीच, परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा पाचवीला पुजलेल्या. यंदा पाणी फाऊंडेशनअंतर्गत वॉटर कप स्पर्धेत याच भागातील आसाणे  गावाने भाग घेतला. श्रमदानाचे महत्व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह पाणी फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी पटवून दिले. तरुण सरपंच चंद्रकांत युवराज पाटील व गावक:यांनाही ते पटले आणि एका तुफान आल्यागत ग्रामस्थ श्रमदानात रमले. 40 ते 42 अंश तापमानात, घामाच्या धारांमध्ये ग्रामस्थांनी काम केले. त्याचे फळ मान्सूनपूर्व पावसातच पहायला मिळाले. गावक:यांच्या श्रमदानाला विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचीही साथ मिळाली.वॉटर कप स्पर्धा गेल्या महिन्यात 24 मे रोजी संपली. त्याआधी गावाने  समतल चर, मातीनाला बांध, वनतलाव, जुने तलाव दुरूस्त करणे, नालाबंडींग आदी कामे केली. या कामांचे वॉटर कपअंतर्गत मोजमापास नुकतीच सुरुवात झाली. त्याआधीच या कामांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.शनिवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले. मान्सूनपूर्व पाऊस येणार की नाही ही शंका असतांनाच शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. साधारणत: एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडला. या पाण्यामुळे आपल्या श्रमदानातील कामांमध्ये पाणी साठले की नाही हे पहाण्यासाठी रविवारचा सूर्योदय होताच ग्रामस्थांनी धाव घेतली. पहातात तर काय? डोंगर उतारावरून नेहमीच वाहून जाणारे पाणी समतल चा:यांमध्ये, माती नाल्यांमध्ये, वन तलावांमध्ये साठलले होते. समतल चरातील पाणी तर जमीनीत मुरले देखील होते. हे पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू निघाले. सरपंच चंद्रकांत पाटील, युवा कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी एकमेकांना साखर भरवून हा आनंद साजरा केला.पावसाळ्यात या भागात ब:यापैकी पाऊस झाल्यास या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवण होईल असा अंदाज आहे. परिणामी श्रमदान आणि मेहनतीला यंदा फळ येईल या आनंदात सध्या आसाणेकर आहेत.