शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांचे आरक्षण व संरक्षण काढण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 21:02 IST

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा : नंदुरबार व शहाद्याच्या सभेत अशोक चव्हाण यांची मोदी सरकारवर टिका

नंदुरबार : घटनेने दिलेले गरिबांचे आरक्षण आणि त्यांचे संरक्षण काढणा:या मोदी व फडणवीस सरकारला येत्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नंदुरबार व शहादा येथील जाहीर सभांमधून केले. देश व राज्यातील परिवर्तनाची सुरुवात नंदुरबारातून झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा शनिवारी दुपारी शहादा तर सायंकाळी नंदुरबारात दाखल झाली. शहाद्यात जनता चौकात तर नंदुरबारात नाटय़गृहात जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यावेळी खासदार अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी एम.संदीप, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,  हुसेन दलवाई, आरिफ नसीम खान, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, र}ाकर महाजन, भाई नगराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,  जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, शोभा बच्छाव, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, मोदी व फडणवीस सरकारने निवडणुकांमध्ये दिलेले सर्वच आश्वासने हवेत विरले. लोकांमध्ये निराशा आली आहे. दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता झालेली नाही. चुनावी जुमला म्हणून या आश्वासनांकडे आम्ही पहात असल्याचे भाजप नेते सांगतात. काँग्रेस निवडणुकांमध्ये जाहीरनामा नाही तर वचननामा देत असते. ते पाच वर्षात पुर्ण कसे होतील याची चिंता पक्षाला असते. परंतु भाजपचे मोदी व त्यांचे नेते फेकूपणात एक नंबर असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यांदा खरे बोलले. सत्ताच येणार नाही म्हणून भरमसाठ आश्वासने देत सुटलो आता ती पुर्ण करण्यासाठी नाकीनऊ येत असल्याचे त्यांनी कबुली देत सरकारलाच उघडे पाडल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने आधारचा वेगळा उद्देश ठेवून ते आणले. परंतु या सरकारने प्रत्येकच गोष्टीत आधार घुसविले. परिणामी सुप्रिम कोर्टाला फटकारे मारावे लागल्यावर आता ते शांत झाल्याचे चव्हाण म्हणाले. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केला जात आहे. घटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. संविधान जाळण्यार्पयत त्यांची मजल जात आहे. प्रत्येक क्षेत्रात संघाचे लोकं घातले जात आहेत. हे सरकार देशाचे हिताचे नाही त्यामुळे परिवर्तन घडविण्याची ही वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. या परिवर्तनाची सुरुवात नंदुरबारातून करून देश आणि राज्याला एक वेगळा संदेश द्यावा असे आवाहन त्यांनी  केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, गेल्या साडेचार वर्षातील जनतेच्या मनातील आक्रोश या जनआक्रोश या माध्यमातून बाहेर निघत आहे. फसव्या घोषणा करण्यात माहीर असलेल्या मोदी व फडणवीस सरकारने कजर्माफीच्या नावाखाली जनतेला चुना लावला. कजर्माफी द्यायचीच नव्हती त्यामुळे 20 पेक्षा अधीक जीआर काढून शेतक:यांना मेटाकुटीस आणून हाती काहीच दिले नाही. अंबानी, अदाणी, रामदेवबाबा यांची झोळी भरण्याचे काम तेवढे या सरकारांनी केले असल्याचा आरोप त्यांनी केला. नोटाबंदी हा मनी लाँड्रीगचा प्रकार होता. रघुराम राजन, पनगडीया, सुब्रमण्यम स्वामी हे जागतिक किर्तीचे व आर्थिक क्षेत्रात नावाजलेली लोकं यांना सोडून गेली. सर्वच आर्थिक आघाडींवर हे सरकार अपयशी ठरल्याचेही त्यांनी   सांगितले.आमदार बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला आहे. येत्या काळातही जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून केवळ घोषणाबाजी करणा:या भाजला थारा देणार नसल्याचे सांगितले.हुसेन दलवाई, आरीफ नसीम खान, नवाब मलीक, सचीन सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या आगळ्या शैलीने कार्यकत्र्यामध्ये जोश निर्माण केला. आगामी निवडणुकांमध्ये     परिवर्तनाची सुरुवात नंदुरबारात होईल अशी ग्वाही काँग्रेस नेत्यांना दिली.