शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ढे टेंभे येथील विहिरीतून वाचवलेल्या मादी बिबट्याची वनक्षेत्रात केली रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्ढे टेंभे ता़ शहादा येथे कुत्र्याला भक्ष्य बनवण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेस्क्यू आॅपरेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्ढे टेंभे ता़ शहादा येथे कुत्र्याला भक्ष्य बनवण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेस्क्यू आॅपरेशन वनविभागाने केले होते़ या बिबट्याला दोन दिवस शहादा वनविभागात ठेवल्यानंतर त्याची रवानगी वनक्षेत्रात करण्यात आली आहे़रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने बिबट्याची रवानगी शहादा वनक्षेत्रात केल्याची माहिती वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली आहे़ उपवनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक वनसंरक्षक आऱएस़ झगडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पवार यांच्यासह वनकर्मचारी यांनी ही कारवाई केली़ दरम्यान बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्यापूर्वी वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली होती़ तीन वर्षे वय असलेल्या मादी बिबट्याची प्रकृती सुदृढ असल्याचे सांगण्यात आले आहे़मादी बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्यात आल्यानंतर तालुक्यातील बिबट्यांचा अधिवास चिंतेचा विषय ठरत आहे़ मध्यप्रदेश सिमा, सातपुड्याचा पायथा आणि तापी काठालगत तब्बल आठ बिबट्यांचा संचार असल्याची माहिती समोर आली आहे़ या बिबट्यांच्या संचार हा प्रामुख्याने शेतशिवार आणि मानवी वस्तीचा परिसर असल्याने भिती वाढत आहे़ तापी काठालगतच्या गावांमध्ये ऊस, केळी, पपईच्या शेतांमध्ये निवास आणि अन्नाची व्यवस्था होत असल्याने बिबट्यांचा संचार येथे वाढल्याचे चित्र आहे़ वनविभागाकडून बिबट्या दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी जाऊन कारवाई होत असली तरी बिबट्यांपासून बचाव करणे किंवा त्यांना कोणत्याही संघर्षाविना शेतशिवारातून हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ गावोगावी रात्री अपरात्री तसेच दिवसाही हिंस्त्र प्राणी दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे़काही दिवसांपूर्वी शेल्टी ता़ शहादा येथे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ वन्यजीव शेतशिवारात मरुन पडत असल्याने त्यांनाही धोका असल्याने तातडीच्या उपाययोजना म्हणून वनविभागाने उपाययोजना करण्याची अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे़