शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तिन्ही पक्षाच्या तुल्यबळ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला : नवापूर पालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:11 IST

प्रा.आय.जी.पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांवर आपला प्रभाव पाडण्यासह त्यांचे मत आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने प्रय}ांची पराकाष्ठा केली. मतदार राजा आता कुणाच्य पारडय़ात आपले मत टाकतो यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे.थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी होणा:या निवडणुकीकरीता झालेला प्रचार शहरवासीयांचे लक्ष वेधून ...

प्रा.आय.जी.पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांवर आपला प्रभाव पाडण्यासह त्यांचे मत आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने प्रय}ांची पराकाष्ठा केली. मतदार राजा आता कुणाच्य पारडय़ात आपले मत टाकतो यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे.थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी होणा:या निवडणुकीकरीता झालेला प्रचार शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेस प्रय}ात आहे तर  काँग्रेसकडुन ही सत्ता हिरावून घेण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शर्थीचे प्रय} होत आहेत.  जनतेच्या पसंतीवर खरे उतरण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपापल्या समर्थकांसह स्वत:सह पक्षासाठी पॅनलला मते मागण्यासाठी एक नव्हे तर दोन ते तीन वेळा मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. मतदानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखविण्यासाठी मतदान यंत्राचे डेमो देखील करुन दाखविण्याचे कार्य उमेदवार व समर्थक कार्यकत्र्यांनी पार पाडले आहे. शहराला लोकनियुक्त नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यासाठी भाजपा शिवसेना युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा व समाजवादी पक्ष व नवापूर विकास आघाडीचे सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. नगरसेवका वीस जागांसाठी दहा प्रभागांमधे 95 उमेदवारांमध्ये निवडणुकीचे घमासान आहे.    भारतीय राष्ट्रीय  काँग्रेसच्या उमेदवार हेमलता अजय पाटील यांच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी हाताळली. गटनेते गिरीश गावीत, दिलीप गावीत, आर. सी. गावीत व कार्यकत्र्याची मोठी फळी त्यांना सहकार्य करीत आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार ज्योती जयस्वाल यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी प्रचाराची धूरा सांभाळली. पक्षाचे एजाज शेख, अनिल वसावे, शैलाबाई टिभे, कमलेश छत्रीवाला, घन:शाम परमार सेनेचे हसमुख पाटील, गणेश वडनेरे व सहकारी सोबत राहिलेत. भाजपकडून प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभांचे आयोजन शहरात झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अर्चना गोरजी वळवी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार शरद गावीत यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. नरेंद्र नगराळे, इम्तियाज लाखाणी, युसुफ फ्रुटवाला, डॉ. इम्रान शेख त्यांच्या सोबतीला आहेत. नवापुर विकास आघाडीच्या सोनल धर्मेद्र पाटील यांचा प्रचार आघाडीच्या पदाधिका:यांनी नियोजन पूर्वक केला. आघाडीची धुरा संदीप पारेख, मंगेश येवले, अॅड. नितीन देसाई यांनी सांभाळली.  निवडणुकीत सर्वसाधारण प्रभागांमधे उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने बंडखोरी पक्षाच्या उमेदवारांसाठी डोकेदूखी ठरली आहे. ही बंडखोरी कुणास तारते किंवा नुकसानकारक ठरते हे लवकरच कळेल. जवळपास सर्वच प्रभागांमधे बहुरंगी लढती आहेत.  त्यातुन काही जागांवर अनपेक्षित निकाल येण्याची चिन्हे आहेत.