रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पाडळपूर, धनपूर, गाढवली, सिंगसपूर या लघुप्रकल्पांवर सिंचन तसेच पाणी पातळीचा मदार महत्वाची ठरत असत़े परंतु नवीनच तयार झालेल्या धनपूर लघुप्रकल्पाला वगळता वरील लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट आह़े त्यामुळे या लघुप्रकल्पाची तत्काळ दुरुस्ती करणे महत्वाचे ठरत आह़े रोझवा, पाडळपूर, गाढवली व सिंगसपूर या लघुप्रकल्पांची दुरुस्ती होत नसल्याने प्रत्येक वेळी पावसाळ्यात जमा होणारे पाणी वाहून जात असत़े रोझवा लघुप्रकल्पाची समस्या तर अत्यंत वाईट आह़े सांडव्याची दगडी भिंत दोन वर्षापासून खड्डेमय झाल्याने भिंतीला मोठमोठी छिद्रे असल्याने छिद्रांमधून पाणी वाहणे सुरुच राहत़े त्यामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो होऊनही पाणी गळती सुरुच राहत आह़े त्यामुळे शेतक:यांचे हक्काचे लाखो लीटर पाणी वाया जात असत़े संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करुनही या भिंतीच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आह़े शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे शेततळे निर्माण करण्याबरोबरच खोलीकरण व नाल्यांची रुंदी वाढवली जात आह़े मात्र चांगल्या दर्जाच्या लघुसिंचन प्रकल्पांसाठी निधी देऊन त्याची दुरुस्ती का करण्यात येत नाही? असा प्रश्नही परिसरातून विचारण्यात येत आह़े रोझवा, पाडळपूर, लघुप्रकल्पांची गेट, पाटचारी, दुरुस्ती झाल्यास सिंचनाखालील क्षेत्र वाढल्यास मदत होऊ शकत़े तसेच लघुप्रकल्पातील जलसाठा गळतीमुळे पाणी वाहून जाणे थांबल्यास पाणीपातळी चांगली राहण्यासही मदत होऊ शकत़े रोझवा प्रकल्पाच्या भिंतीच्या दुरुस्तीची मागणी होत असताना स्थानिक शेतक:यांकडूनही श्रमदानाची तयारी दाखविण्यात येत आह़े संबंधित विभागानेही पाण्याचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे अशी अपेक्षा आह़े
तळोदा तालुक्यातील प्रकल्पांची दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:44 IST