शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारची कन्या रेणुका गावीत ठरली वैद्यकीय महाविद्यालयाची प्रथम विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 21:59 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शासकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेणुका प्रकाश गावीत ही नंदुरबारची कन्या प्रथम ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शासकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेणुका प्रकाश गावीत ही नंदुरबारची कन्या प्रथम विद्यार्थिनी ठरली आहे. रेणुका गावीत हीने २०२०-२१ या वर्षापासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत महाविद्यालयात रेटेंन्शन अर्ज भरून देत प्रवेश निश्चित केला. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२०-२१ या वर्षात प्रथम वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत सामाईक प्रवेश परीक्षेतून उत्तीर्ण ८४ विद्यार्थ्यांची यादी अंतिम झाली आहे. १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यांतर्गत पहिल्या फेरीत रेणुका प्रकाश गावीत या विद्यार्थिनीचा प्रथम प्रवेश निश्चित झाला आहे. प्रथम प्रवेशित विद्यार्थिनी रेणुका गावीत हीचा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी शुक्रे यांनी गाैरव केला. यावेळी खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार डाॅ. विजयकुमार गावीत, विद्यार्थिनीचे पालक प्रकाश गावीत हे उपस्थित होते. २०२०-२१ या वर्षात नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने राज्य कोट्यातून ८५ जागा व ऑल इंडिया कोट्यातून १५ जागा भरल्या जाणार आहेत. ऑल इंडिया कोट्यातील जागा भरण्यास विलंब असल्याने या जागा महाराष्ट्र कोट्यातून भरल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रवेश प्रक्रिया तीन फेरीत पूर्ण होणार असल्याने संस्थेमध्ये १०० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने शैक्षणिक प्रयोजनासाठी अत्यावश्यक असलेल्या तीन लाख रूपयावरील यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय व शैक्षणिक कामे व प्रयोगशाळेसाठी अत्यावश्यक वर्ग १ ते वर्ग चारचे कर्मचारी लवकरच पुरवण्यात येतील असे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी कळवले आहे.