शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रिमङिाम पावसातही मतदानासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाच्या रिपरिपमध्येही मतदानाचा उत्साह शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून आला. दरम्यान, जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाच्या रिपरिपमध्येही मतदानाचा उत्साह शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून आला. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. गारवा देखील असल्यामुळे मतदानासाठी ब:यापैकी उत्साह दिसून आला.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात आवश्यक त्या उपययोजना करण्यात आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहादासह परिसर तसेच प्रकाशा परिसरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मतदार रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची काही काळ धावपळ उडाली. तर काहींनी मतदान केंद्र इमारतीचा आडोसा घेतला. आदर्श मतदान केंद्रात मंडप टाकण्यात आला होता. तो देखील गळू लागला होता. साधारणत: अर्धा ते पाऊण तास पाऊस सुरू होता. त्यामुळे या काळात मतदानाची टक्केवारी काहीसी मंदावली होती

. शहादा तालुक्यातील अनेक केंद्रांवर उत्साहात मतदानशहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. बहुतांश ठिकाणी सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यातील सर्वात मोठे असलेले म्हसावद गावात सरासरी 61.32 टक्के मतदान झाले. या गावात एकूण सहा हजार 506 पैकी तीन हजार 990 मतदारांनी मतदान केले. गावात एकूण सहा मतदान केंद्र होती. त्यावर अनुक्रमे 60.81, 59.81, 56.27, 62.31, 63.68 व 63.47 टक्के मतदान झाले. गोगापूर येथे दोन मतदान केंद्र होते. या दोन्ही केंद्रांवर एकूण एक हजार 842 मतदार होते. त्यापैकी एक हजार 136 मतदारांनी मतदान केले. कवळीथ येथील मतदान केंद्रावर एक हजार 535 पैकी एक हजार 52 मतदारांनी मतदान केले. ब्राrाणपुरी येथे सरासरी 63.08 टक्के मतदान झाले. प्रकाशा येथे 58.12 टक्के मतदान झाले. कु:हावद येथे एकूण 768 मतदारांपैकी 425 मतदारांनी मतदान केले. सरासरी 55.33 टक्के मतदान झाले. दामळदा येथील एका केंद्रावर 780 पैकी 466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दुस:या केंद्रावर 828 पैकी 465 मतदारांनी मतदान केले. मामाचे मोहिदे येथे सरासरी 62 टक्के मतदान झाले. डामरखेडा येथे 52 टक्के तर मोहिदेतर्फे हवेली येथे 71.14 टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या खेडदिगर येथील मतदान केंद्रावर 66.13 टक्के मतदान झाले. पुरुषोत्तमनगर येथील केंद्रावर एक हजार 172 पैकी 669 मतदारांनी मतदान केले. सरासरी 57 टक्के मतदान झाले. तिखोरा येथे 68.93 टक्के तर कहाटूळ येथे 54.77 टक्के मतदान झाले. पिंप्री येथे 54 टक्के, उंटावदला 75.59 टक्के तर फेस येथे 62 टक्के मतदान झाले. वडाळी येथे तीन हजार 457 पैकी एक हजार 958 मतदारांनी मतदान केले. सरासरी 56.63 टक्के मतदान झाले. काथर्दा येथे 57 टक्के तर कोंढावळ येथे दोन हजार 695 मतदार होते. त्यापैकी एक हजार 337 मतदारांनी मतदान केले. परिवर्धे येथे एकूण तीन मतदान केंद्र होती. त्यात एकूण दोन हजार 799 मतदारांपैकी एक हजार 533 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी सरासरी 54.76 टक्के मतदान झाले तर सारंगखेडा येथे एकूण सात मतदान केंद्र होते. त्यावर अनुक्रमे 50.45, 60.43, 66.89, 49.02, 46.35, 65.4 व 62.83 टक्के मतदान झाले.तळोदा : 60 टक्के मतदानशहादा विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या मतदानात तळोदा तालुक्यातून साधारण 60 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे. विशेष म्हणजे सकाळी 11 वाजेपूर्वीच अनेक ठिकाणी 40 टक्के मतदान झाले होते. बहुतेक ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांच्या रांगा लागून होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळाला. तालुक्यातून सर्वात जास्त मतदान त:हावद पुनर्वसन येथे झाले. तेथे साधारण 85 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.शहादा विधान सभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तळोदा तालुक्यात साधारण 135 मतदान केंद्रे  उभारण्यात आली होती. सोमवारी घेण्यात आलेल्या मतदानात तालुक्यातून साधारण 60 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क  बजाविला आहे.ग्रामीण भागातील बहुसंख्य मतदान केंद्रावर सकाळी 11 वाजेपूर्वीच 45 ते 50 टक्के मतदान झाल्याचे चित्र होते. त्यानंतर दुपारी मतदानाचा वेग कमी झाला. तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या सहा वसाहती वसल्या आहेत. या सर्वच वसाहतींमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. त:हावद पुनर्वसन वसाहतीनंतर रेवानगर वसाहतीत 80 टक्के मतदान झाले आहे. इच्छागव्हाण येथेही 81 टक्के मतदान झाले आहे. नर्मदानगर 82, रोझवा पुनर्वसन 63, गोपाळपूर पुनर्वसन 65, सरदारनगर 61 मतदान झाले.

आदर्श व सखी मतदानकेंद्रांवर सेल्फीसाठी रांगानंदुरबार : प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एक सखी व एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. शिवाय सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आले होते. अशा ठिकाणी मतदारांची सेल्फीसाठी गर्दी होत होती. नंदुरबार मतदारसंघात मिशन विद्यालयात सखी तर श्रॉफ विद्यालयात आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याशिवाय अक्कलकुवा मतदारसंघात गंगापूर सखी तर देवमोगरा आदर्श मतदान केंद्र होते. तसेच नवापूर मतदारसंघात 192 क्रमांकाचे सखी तर 193 क्रमांकाचे आदर्श मतदान केंद्र होते. शहादा मतदारसंघात 176 केंद्र क्रमांक सखी मतदान केंद्र होते. सखी मतदान केंद्रात सर्व कामकाज महिलांनी सांभाळले. आदर्श मतदान केंद्रात मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध होत्या. दोन्ही केंद्रांवर सेल्फी पॉईंट होता. 

110 मतदान केंद्रांवर वॉकीटॉकी आणि रनरनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात  संपर्काचा अभाव लक्षात घेता  यंदा देखील रनरची सोय करण्यात आली होती. शिवाय संपर्क  नसलेल्या ठिकाणी वायरलेस सेटचा उपयोग करण्यात आला.  त्याद्वारे मतदान अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात संपर्क साधून मतदानाची आकडेवारी देण्यात आली. दुर्गम भागातील मतदान केंद्रांवरील आकडेवारी मिळविण्याठी मोठी कसरत होत होती. त्यामुळे प्रशासनाने रनर, वॉकीटॉकी आणि वायरलेस सेटचा वापर करण्याचे निश्चीत केले होते. त्याचा उपयोग यंदाच्या निवडणुकीत चांगल्या प्रकारे झाला. अक्कलकुवा मतदार संघातील 110  मतदान केंद्रांवर मोबाईल किंवा इतर दूरध्वनी साधनांची जोडणी नसल्यामुळे त्या मतदान केंद्रांना वायरलेस सेटची जोडणी देण्यात आली आहे. त्यासाठी 39 वॉकी टॉकी सेट उपलब्ध झालेली आहेत. होराफळी, धडगाव, व मोलगी या ठिकाणी रिपीटरहुन वॉकी टॉकी सेट नियंत्रित केले जाणार आहेत. या केंद्रांवर रनर ची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.