शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये सीबी उद्यान व वॉटरपार्कचे लोकार्पण

By admin | Updated: June 25, 2017 17:47 IST

नंदुरबार येथील सहा एकरामध्ये विविध मनोरंजक दालने

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.25 : राजे संभाजी सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित नंदुरबार नगरपालिकेच्या सीबी उद्यान व वॉटरपार्कचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल़े शहरातील वाघोदा रोडवर या वास्तू साकारण्यात आल्या आहेत़ 
अध्यक्षस्थानी आमदार सुरूपसिंग नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री माणिकराव गावीत,  आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार क़ेसी़पाडवी, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नेहा डिसुजा, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, माजीमंत्री पद्माकर वळवी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारूलता टोकस, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती़ 
उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते प्रारंभी वाघोदा रस्त्यावरील चौकात पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘बालपण’ या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आल़े त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पालिकेच्या सीबी उद्यान आणि वॉटरपार्कचे फित कापून उद्घाटन करण्यात आल़े आर्किटेक्ट भूषण पुराणिक यांचा गौरव माणिकराव ठाकरे यांनी केला़ 
गार्डन बनला सेल्फीस्पॉट 
म्युङिाकल फाउंटन आणि विविध आकर्षक खेळण्यांची सुविधा असलेल्या सीबी उद्यानात पहिल्याच दिवशी लहान बालकांसह त्यांच्या पालकांची गर्दी झाली होती़ या गर्दीत ठिकठिकाणी सेल्फी घेणा:यांची मोठी गर्दी होती़ दुपारच्यावेळी रिमङिाम पावसाला न जुमानता शहरातल्या कानाकोप:यातून नागरिक याठिकाणी ‘रविवार’चा आनंद घेण्यासाठी आले होत़े 
मान्यवरांनी  गार्डन आणि वॉटरपार्कची पाहणी केली़ प्रसंगी त्यांच्याहस्ते वॉटरपार्कमधील विविध राईडसचे रिमोटद्वारे उद्घाटनही करण्यात आल़े