शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोविड रुग्णालयांसाठी नियमावली जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

कोविड रुग्णालयांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून, जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलेले दर रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश ...

कोविड रुग्णालयांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून, जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलेले दर रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

खासगी कोविड रुग्णालयांना मंजूर दरापेक्षा अधिकचे दर आकारता येणार नाहीत व त्याबाबत कुठलीही तक्रार येणार नाही, याची दक्षता रुग्णालय व्यवस्थापनाने घ्यावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागावर ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन बेडची संख्या, रुग्ण उपचार घेत असलेल्या बेडची संख्या व रिक्त बेडची संख्या दर्शविणारा फलक लावावा.

रुग्णालयात तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लावावी. संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांची नियंत्रण व पर्यवेक्षणासाठी समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी वेळोवेळी वरील बाबींची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास, त्याबाबतचा अहवाल जिल्हा दरपत्रक समितीकडे सादर करावा. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.