शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

16 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या तिमाही नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. कामगारांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या तिमाही नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. कामगारांमध्ये काही अंशी जनजागृती झाल्यामुळे मोहिमेच्या या तीन महिन्यातच आठ हजार 500 कामगारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे आजर्पयत 16 हजार 287 कामगारांची नोंदणी झाली असून त्यांना मंडळामार्फत विविध योजना दिल्या जाणार आहे.बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यात तीन महिन्यांची विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी विविध बांधकाम व्यावसायिकांना सूचना देण्यात आली होती. तर बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांचे खाते उघडून त्यांची नोंदणी करण्यावर भर दिला गेला होता. बांधकाम व्यावसायिकांकडे  काम करणारे मजूर, प्लंबर, लिफ्ट मेंटेनन्स, टाइल्स फिटिंग, ब्रिकवर्क, पीओपी, इलेक्ट्रिकल आदी छोटी-मोठी कामे करणा:या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली. त्यानुसार आजर्पयत 16 हजार 287 कामगारांची नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर मंडळांच्या योजनांचे लाभ, तसेच अनुदान कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यासाठी कामगारांच्या बँक खात्याचा क्रमांक, आधार कार्ड असणे अपेक्षित होते. मात्र, अनेक कामगारांकडे बँक खाते, आधार कार्ड नव्हते. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेस काहीशी अडचण आलीे, या अडचणीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनाही या कल्याणकारी मंडळामार्फत  करण्यात आल्या आहे. याशिवाय कायद्यानुसार, कामगारांसाठी सुरक्षा विषयक पाहणीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. नोंदणी केलेल्या कामगारांना अवजारे खरेदीसाठी आणि सुरक्षेसाठी अर्थसाह्य केले जाते. त्याअंतर्गत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व अत्यावश्यक संच  वाटप केले जाणार आहे. त्यात अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे.  याशिवाय नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना शैक्षणिक अर्थसाह्य, तर अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत कामगारांना अर्थसाह्य केले जाते. या योजनेबाबत जनजागृतीसाठी ठिकठिकाणी प्रचार करण्यात आला. त्यामुळे नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला असून तीनच महिन्यात आठ हजार 500 कामगारांची नोंदणी झाली. त्यामुळे आजर्पयत नोंदणी झालेल्या एकुण 16 हजार 287 जणांना लाभ दिला जाणार  आहे.

या योजनेंतर्गत कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा संच मोफत वाटप केले जाणार आहे. त्यात बुट, हेल्मेट, ग्लोव्हज, हार्नेस, लोखंडी पेटी, मच्छरदाणी, स्टीलचा डबा, बॅटरी आदी सांहित्यांचा समावेश आहे. त्यामुळे कामगार सुरक्षीत राहणार आहे.