शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक नियोजन आराखडा तयार : नंदुरबार व शहादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 12:35 IST

आगामी 20 वर्षाची लोकसंख्या धरली गृहित, हरकती मागविणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 9 : नंदुरबारसह परिसरातील 17 गावे शहादासह लगतची सहा गावे आणि दहा हजारापेक्षा अधीक लोकसंख्या असलेल्या प्रकाशा, सारंगखेडा व अक्कलकुवा या गावांचा आगामी 20 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रादेशिक नियोजन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ावर येत्या दोन महिन्यात हरकती घेता येणार आहेत. नगर विकास विभागाअंतर्गत नंदुरबार प्रादेशिक नियोजन मंडळाने नंदुरबार व शहादा या मोठय़ा शहरांसह दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकरीता व या गावांची विकसनक्षमता विचारात घेवून विकास केंद्र व सविस्तर नकाशे तयार करण्यात येत आहेत. एकुण तीन विकास केंद्र आणि नंदुरबारसह शहादा शहरालगतच्या गावांचा त्यात समावेश आहे. गेल्या 50 वर्षातील अर्थात 1961 ते 2011 या कालावधीतील लोकसंख्या लक्षात घेवून 2036 करीता विविध पद्धतीने प्रक्षेपीत लोकसंख्या यांची आकडेमोड करण्यात आलेली आहे. 50 व्यक्ती प्रती हेक्टर या प्रमाणे रहिवास विभाग, शासकीय-निमशासकीय यांच्या अस्तित्वातील जमीन वापराप्रमाणे सार्वजनिक निमसार्वजनिक वापर तसेच उर्वरित भागाकरीता ना विकास विभाग याप्रमाणे नियोजन केलेले आहे. प्रस्तावित रहिवास वापर विभागात प्रस्तावीत रस्ते यांचे नियोजन करून जमीन वापर नकाशे हे प्रादेशिक नियोजन मंडळाकडे अधिनियमाच्या कलम 16 अन्वये मंडळाच्या सभेत सादर करण्यात आली आहेत.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. बैठकिला जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, सार्वजनिकक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ आदी उपस्थित होते. बैठकीत याबाबतची सर्व कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देवून सदरचे प्रस्तावीत जमीन वापर नकाशे हे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 16 च्या तरतुदीनुसार तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. प्रादेशिक योजनेतील दोन परिसर क्षेत्रे तसेच तीन विकास केंद्रे यांचे प्रस्तावित जमिन वापर नकाशे यावर नागरिकांच्या सुचना, हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकतींवर सुनावणी होऊन नंतर त्या आराखडय़ास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.यावेळी अभियंता चंद्रकांत निकम, जिल्हा उद्योग केंद्राचे ए.टी.पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पवार, संजय संगेकर, निलेश चव्हाण, नंदलाल चौधरी, अभिजीत महापात्रे आदी उपस्थित होते.