शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

वीज कंपनीची वसुली माेहीम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागांत वीज वितरण कंपनीची बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे कंपनीची आर्थिक ...

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागांत वीज वितरण कंपनीची बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जिल्ह्यातील घरगुती व कृषिपंपधारक यांच्याकडे थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी सातत्याने तालुका व ग्रामीण भागात दाैरे करून ग्राहकांना बिल भरण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

बाजारपेठा थंडावल्या

नंदुरबार : होळीसाठी मोठी तयारी करणाऱ्या बाजारपेठा यंदा थंडावल्या आहेत. सलग दोन दिवस लाॅकडाऊनचे नियोजन व वाढता कोरोना यामुळे व्यापाऱ्यांनी मालाची योग्य ती आवक केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे यंदा लाखो रुपयांची उलाढाल बंद होऊ शकलेली नाही.

ग्रामीण भागात रुग्ण वाढीने वाढल्या चिंता

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील खोक्राळे, घोटाणेसह विविध गावांत कोरोनाबाधितांची संख्या समोर येत आहे. यातून चिंता व्यक्त करण्यात येत असून, आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर शिबिरे घेऊन नागरिकांना मास्कचा वापर वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

व्यवसाय ठप्प

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दर शनिवारी व रविवारी लाॅकडाऊन होणार आहे. यामुळे किरकोळ व्यावसायिक संकटात सापडले आहेत. आधीच सायंकाळी सातपर्यंतच व्यवसायांची मुदत आहे. त्यात दोन दिवस बंद राहणार असल्याने व्यवसायाचे दिवस कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पाणी व्यवसाय तेजीत

नंदुरबार : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणी विक्रीचा व्यवसायही तेजीत आला आहे. यात पॅकेज वाॅटरसह शुद्ध पाणीपुरवठा करणे वाढले आहे. यातून त्या-त्या व्यावसायिकांना लाभ होत आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यंत पाणी विक्रीचा व्यवसाय फोफावला असून यातून मोठी उलाढाल होते.

कोळदे येथील खडीमुळे समस्या

नंदुरबार : तालुक्यातील कोळदे गावापासून विसरवाडी ते सेंधवा महामार्ग सुरू होतो. दरम्यान नंदुरबारकडून येणारी वाहने महामार्गावर यावीत यासाठी खोंडामळी फाट्यावर खडीचा चढावा करण्यात आला आहे. हा चढाव वाहनधारकांसाठी धोकेदायक ठरत असून, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आहे. खडीत वाहन घसरून दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याने येथे भराव करण्याची मागणी आहे.

सांडपाणी रस्त्यावर

नंदुरबार : शहरातील तांबोळी गल्ली परिसरातील ड्रेनेजमधून सांडपाणी बाहेर येत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पाणी थेट तूप बाजारापर्यंत येत आहे. या मार्गावर बँका असल्याने त्याठिकाणी येणा-या ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे.

समस्या कायम

नंदुरबार : शहरातील कोरीट नाक्यावर मातीचा ढीग रस्त्याच्या मधोमध असल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. गिरीविहारकडून भरधाव येणा-यांना मातीचा ढीग व पुढील खड्डा दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. याठिकाणी रस्ता समतल करण्याची मागणी आहे.

तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे शिवारातील वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. वादळीवाऱ्यांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु त्यास अद्याप यश आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वीजपुरवठा नसल्याने गावाची पाणी योजना पूर्णपणे बंद पडली असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस बंदोबस्त

नंदुरबार : तालुक्यातील कोरीट गावाजवळील सावळदा फाट्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे.

भाजीपाला थांबला

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागांतून होणारी भाजीपाला आवक सध्या पूर्णपणे मंदावली असल्याचे चित्र आहे. यातून बाजारपेठेवर अवकळा पसरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आसपासच्या परिसरातून कैरी आवक होत असून, यातून आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे.