कार्यक्रमास सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील, नंदूरबारचे माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, शहाद्याचे माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशिर, नुह नुरानी, माजी उपनगराध्यक्ष युनूस पठाण, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, नगरसेवक डॉ.अजहर पठाण, जितेंद्र जमदाळे, बांधकाम सभापती वसीम तेली, नगरसेवक रियाज कुरेशी, वाहीद पिंजारी, मुजू पहिलवान, इकबाल शेख, प्रा. लियाकत अली सैयद, पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर पाटील, हलवाई जमाअतचे अध्यक्ष मुशीर हाजी हलवाई, गनी हाजी हलवाई, सफरद हाजी हलवाई, अल्ताफ शेख, सईद शेख, मोहसीन शेख, परवेज शेख, रहीम शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नंदूरबार पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेले हारुण अब्दुल रशीद हलवाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी दीपक पाटील म्हणाले की, राजकीय क्षेत्रात काम करीत असताना नेतृत्व करणारा नेत्याशिवाय कार्यकर्ता हा मोठा होत नाही. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने, निस्वार्थी व मेहनतीने केल्यास त्याला नेतृत्वाकडून कामाची पावती मिळतेच. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली हारुण अब्दुल रशीद हलवाई यांनी कार्यकर्ता म्हणून काम केल्याने त्यांच्या कार्याची पावती म्हणून पालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. परवेज खान व प्रा.सैयद यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.अजहर पठाण यांनी तर सूत्रसंचालन आरिफ शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी सादिक हलवाई, मोहसिन हलवाई, सईद हलवाई, अस्लम हलवाई, अल्ताफ हलवाई, अकतर हलवाई, अफसर हलवाई, जुबेर हलवाई, इकबाल हलवाई, परवेज हलवाई, शोएब हलवाई आदींनी परिश्रम घेतले.
शहाद्यात हलवाई जमाअत समाजातर्फे सत्कार समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST