लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत जिल्ह्यातील नंदुरबार वगळता तिन्ही जागांचे उमेदवार जाहीर झाले. नंदुरबार वगळण्यात आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान,, जिल्हाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भुमिकेबाबत जिल्ह्यात उत्सूकता आहे. येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. रघुवंशी यांनी मात्र, तुर्तास तसा कुठलाही विचार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. परंतु या घडामोडीतच रविवारी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील चार जागांपैकी नंदुरबारच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे तर्कवितर्काना जोर आला आहे. खरेच आमदार रघुवंशी काही निर्णय घेतात किंवा त्यांचा मोठा गेमप्लॅन आहे याबाबत येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकत्र्यानी आमदार रघुवंशी हाच आमचा पक्ष असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार रघुवंशी शिवबंधन बांधतात की आणखी दुसरा काही निर्णय घेवून राजकीय भुकंप घडवितात याकडे राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागून आहे.दरम्यान, आता भाजपच्या उमेदवारी यादीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. काय निर्णय होतो याकडे नजरा लागून आहेत.
Vidhan Sabha 2019: उमेदवार जाहीर न केल्याने तर्कवितर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:23 IST