शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोघांच्या जन्माने ‘हिरावलेले ते’ परतल्याचा आभास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:51 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सव्वा वर्षापूर्वी नियतीने एकाचवेळी दोघा भावांना हिरावून घेतल्यानंतर उन्मळून पडलेल्या माता-पित्याने वैद्यकीय आधार घेत पुन्हा मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला़  पन्नाशीनंतर घेतलेल्या निणर्यात मातेच्या पोटी जुळेच जन्माला आल्याने हिरावलेले ते दोघे परत आल्याची भावना तळोदा शहरातून व्यक्त होत आह़े  तळोदा येथील शनि गल्लीतील राजेंद्र ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सव्वा वर्षापूर्वी नियतीने एकाचवेळी दोघा भावांना हिरावून घेतल्यानंतर उन्मळून पडलेल्या माता-पित्याने वैद्यकीय आधार घेत पुन्हा मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला़  पन्नाशीनंतर घेतलेल्या निणर्यात मातेच्या पोटी जुळेच जन्माला आल्याने हिरावलेले ते दोघे परत आल्याची भावना तळोदा शहरातून व्यक्त होत आह़े  तळोदा येथील शनि गल्लीतील राजेंद्र पुंजू पाटील (55) यांची दोघे मुले राहूल (28) व विशाल (23) हे दोघे जुलै 2016 मध्ये मित्रांसह धडगाव तालुक्यातील बिलगाव येथे निसर्ग पर्यटनासाठी गेले होते. त्यात तेथील नयनरम्य धबधब्याच्या मोह न आवरता आल्याने ही दोघे भावंडे धबधब्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यात त्यांचा जागीच अंत झाला़ दोघांच्या अकाली मृत्यूमूळे राजेंद्र व उषाबाई पाटील या दोघांना मोठा धक्का बसला़ यातून सावरण्याचा प्रय} ते करत असले तरी  तरूण मुले गेल्याचे दु:ख ते विसरू शकत नव्हते. नातेवाईकांनी वेळावेळी साथ देऊनही त्यांचे दु:ख मात्र कमी झालेले नव्हत़े त्यातच उषाबाई ह्यांची 22 वर्षापूर्वी संतती नियमन शस्त्रक्रिया झाल्यामुळे दाम्पत्याला अधिकच दु:खी होते. तथापि एका नातेवाईकाने  सल्लानुसार पूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेबाबत नाशिक येथील डॉक्टरांच्या सल्ला घेतला होता़ यात शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मातृत्व शक्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़   त्यामुळे पाटील दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया करून घेतली होती़ त्यांनर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार करून घेतल़े गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी घेतलेल्या उपचाराचे फलित म्हणजे गेल्या तीन दिवसांपूर्वीच उषाबाई यांनी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दोघा जुळ्यांना जन्म दिला. साधारण तीन किलो वजनाची ही बालके असून, दोघांची प्रकृती ही सुदृढ असल्याची माहिती देण्यात आली आह़े सोबत बरोबर मातेची प्रकृतीही चांगली आहे. दुर्देवी घटनेत वंशाचे दिवे हरपल्यानंतर पन्नाशी नंतर पाटील दाम्पत्यांना पुन्हा दोन जुळे जन्माला आली आहेत़ जन्माले आलेले दोघेही हुबेहूब राहूल अन् विशाल या दीड वर्षापूर्वी मयत झालेल्या मुलांसारखेच दिसत असल्याने त्यांनीच पुर्नजन्म घेतला असल्याचे बोलले जात आह़े