शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

देवी दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देवीचे दर्शन घेण्यासाठी चुलत भावासोबत जात असलेल्या महिलेला धमकवून चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देवीचे दर्शन घेण्यासाठी चुलत भावासोबत जात असलेल्या महिलेला धमकवून चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना खेडदिगर, ता.शहादा येथे ६ रोजी घडली. याबाबत चौघांविरुद्ध म्हसावद पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहित कोळी, बादल मेहतर, आकाश मेहतर, आसिफ ईस्माईल कुरेशी सर्व रा.खेतिया, पानसेमल असे संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, खेतिया येथील महिला आपल्या चुलत भावासोबत कोचरा येथे देवीच्या दर्शनासाठी पायी जात होती. सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास महिला व तिचा चूलत भाऊ खेडदिगर शिवारातील पायवाटेने जात असतांना रोहीत कोळीसह चारजण त्यांच्याजवळ आले. शेतात एकटे काय करीत आहे म्हणून धमकवले. परंतु महिला आणि सोबत असलेल्या युवकाने आम्ही भाऊ-बहिण असून देवीच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. तरीही चौघांनी ऐकुण घेतले नाही. त्यांना धमकवून मारहाण केली. रस्त्याने जाणाºया काही जणांनी त्यांना समजवले. भितीने महिलेचा चुलत भाऊ तेथून पसार झाला. त्यानंतर चौघांनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटून महिलेने गाव गाठले आणि आपबिती सांगितली. नंतर म्हसावद पोलीस ठाण्यात जावून चौघांविरुद्ध फिर्याद दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक किरण पवार करीत आहे.