शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडय़ात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला शनिवारपासून उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्ताने 150 पेक्षा अधीक जणांनी नवस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला शनिवारपासून उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्ताने 150 पेक्षा अधीक जणांनी नवस फेडण्यासाठी तुला केली. दरम्यान, यात्रोत्सवानिमित्ताने भरण्यात येणारा अश्व बाजारही चांगलाच रंगात आला असून, सुमारे 2200 पेक्षा अधिक घोडे येथे विक्रीसाठी आले.दत्त जयंतीनिमित्त शनिवारी पहाटे पूजा अर्चा होवून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पहिल्याच दिवशी 50 हजारापेक्षा अधीक भाविकांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतल्याची माहिती दत्त मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अजरुन पाटील, सचिव भिक्कन पाटील व उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.पहाटे पंचामृत स्थान, उपहार दाखवून विधीवत पूजा करून दत्त मंदिर पहाटे तीन वाजेपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रात्री एक ते दीड वाजेपासूनच भाविकांनी मंदिरासमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. पहाटे तीन वाजेनंतर दर्शनाला सुरूवात झाल्यापासून महिला व पुरूषांच्या रांगा दिवसभर दर्शनासाठी सतत सुरू होत्या.सारंगखेडा दत्त मंदिर परिसरात नवस फेडण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यात तुलेचा            नवस फेडण्यासाठीही भाविक मोठय़ा संख्येने मंदिर परिसरात होते. शनिवारी दीडशे तुला उतरविण्यात आल्या. यात गुळ, साखर, पेढे, केळी, सफरचंदच्या तुला करण्यात आल्या.चौथा शनिवारी शासकीय सुटी असल्याने सकाळपासूनच दत्त            मंदिरात भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी दिसून आली. त्याच बरोबर यात्रेच्या दिवसी गावात गर्दी होती. अगदी 10 वाजेपासून यात्रेतील            मुख्य गल्ली, भांडी बाजार, मीना बाजार, खेळण्यांची दुकाने, हॉटेल्स फुल झाल्या होत्या. पालखीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी दाटली           होती.यात्रोत्सवात परिसरातील पुसनद, शहादा, कहाटळ, कौठळ, कु:हावद, निमगुळ आदी परिसरातील भाविकांनी पायी येवून दत्त महाराजांचे दर्शन घेतले. या वेळी अनेक भाविक पायी नवस फेडण्याकरीता येतांना दिसून आले.