शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कालू बनलेल्या रमेशचे फोडले शहाणाने बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:22 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  १२ नोव्हेंबर रोजी एलसीबीने सिंदीदिगर येथील अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एका व्यक्तीस अटक ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  १२ नोव्हेंबर रोजी एलसीबीने सिंदीदिगर येथील अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एका व्यक्तीस अटक केली होती. त्याने आपले नाव कालूसिंग पावरा सांगितले होते. परंतु दुसऱ्या एकास संशयितास ताब्यात घेऊन त्याच्यासमोर कालूची चौकशी केली असता मुख्य संशयित असलेला कालू हा रमेश असल्याचे समोर आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला लहान भाऊ कालूसिंग असून मी रमेश असल्याचे सांगितले. रमेश व कालूने पोलिसांनाही लाडू देत गुंगारा देण्याचा प्रयत्न       केला.याबाबत माहिती अशी, सिंदीदिगर शिवारात एलसीबीने धाड टाकून अवैध दारूचा कारखाना नष्ट केला होता. एकूण एक लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. मुख्य सूत्रधार कालूसिंग याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला म्हसावद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. तपासादरम्यान त्याने बनावट दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हा मलगाव येथील शहाणा जगन ढिवरे याच्याकडून आणत असल्याचे सांगितले. पोलिसांनी मलगाव येथे जाऊन शहाणा ढिवरे यास ताब्यात घेतले. म्हसावद पोलीस ठाण्यात कालूसिंग व शहाणा यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी सुरू केली असता पोलिसांच्या तोंडून वारंवार कालूसिंग असे नाव उच्चारले जात होते. त्यामुळे शहाणा हा बुचकळ्यात पडला. रमेशला कालूसिंग म्हणून का पोलीस बोलत आहेत असा प्रश्न त्याला पडला. त्याने पोलिसांना हा कालूसिंग नसून रमेश असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या भुवया देखील उंचावल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण रमेश खुमानसिंग       पावरा असून आपला लहान भाऊ कालूसिंग खुमान पावरा असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारवाई केली तेंव्हा कालूसिंग याने आपल्याला गुन्हा अंगावर घेण्यास सांगून नाव कालूसिंग असेच सांगावे म्हणून बजावले होते. त्यानुसार आपण कालूसिंग हे नाव सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले. पोलिसांनी देखील कपाळावर हात मारून घेतला.याबाबत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शांताराम पवार यांनी फिर्याद दिल्याने रमेश खुमानसिंग पावरा, रा.कुंड्या, ता.धडगाव, बेहरमसिंग दिवल्या पावरा, रा.कुंड्या, कुवरसिंग, मेहमल व खुनश्या रा.सिंदीदिगर, ता.धडगाव यांच्याविरुद्ध मुख्य संशयितास कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्यासाठी खोटी माहिती देणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भीमसिंग ठाकरे करीत आहे.