यावेळी उपशिक्षणाधिकारी रोकडे म्हणाले की, विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे व प्रत्येक विद्यार्थ्याची दररोज टेम्परेचर चाचणी करावी, अशा सूचना त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले. शालेय समितीचे चेअरमन शरद मराठे यांनीही विद्यार्थ्यांना व पालकांना कोरोना या महाभयंकर आजाराविषयी काळजी घ्यावी, असे सांगितले. केंद्रप्रमुख गवळे व मुख्याध्यापक एच.बी. घोडेस्वार यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेचा पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. शाळेत निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात आली. या वेळी मान्यवरांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच रेखाबाई पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष शरद मराठे, पोलीस पाटील वंदना पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक एच.बी. घोडेस्वार, बी.एस. साळुंखे, एस.एस. देवरे, एस.आर. सोनवणे, ए.टी. पावरा, एस.एन. पाटील, एस.एस. वनगुजरे, व्ही.जी. बोरसे, जे.ए. आहिरे, सी.एस. साळी आदी शिक्षक-शिक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
रजाळे जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST