शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लीम समाजातर्फे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जमियते उलेमा ए हिंद तर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जमियते उलेमा ए हिंद तर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदनही देण्यात आले. आंदोलनात मोठय़ा संख्येने मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते.शासकीय, निमशासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, 2014 मध्ये पाच टक्के आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर ते टिकले नाही. उच्च न्यायालयाने आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय दिला होता. असे असतांनाही मुस्लिम आरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाहू महाराज, तत्कालीन बॉम्बे सरकार यांनीही मुस्लिम समाजाला मागासवर्ग म्हणून घोषीत केले होते. सच्चर समितीच्या अहवालात देखील अनेक उल्लेख आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने देखील मुस्लिम समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण देण्याबाबत न्याय निवाडा दिला आहे. त्यामुळे विशेष मागास प्रवर्ग अ या अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जमिअत उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष मौलाना जकरिया रहेमानी, मौलाना जावीद सादोरी, मौलाना हाफिज अ. कादिर, मौलवी आरिफ रहमानी, मौलवी वसीम बागवान, मौलाना हुजेफा  ईशाअती, मौलाना झुल्फिकार, नगरसेवक परवेज खान, एजाज बागवान, मुफ्ती ईमरान, मुक्ति उसामा, हाफिज फरहान, हाजी इरफान मेमन, सैय्यद नसिर अली, सलीम लोहार, सलीम बागवान, इस्माईल मंसुरी, जमाल खाटीक, ईमरान मेमन,अ. कादिर मिया,मिजान, सैय्यद इसरार अली, आरिफ कमर शेख,शे. सादिक, सैय्यद सज्जाद, साकिब अंवर, फिरोज मिस्तरी, नवाज काझी, साजीद पठाण कुरेशी, वसीम धोबी, सैय्यद अबरार अली, एजाज पठाण, साजिद सैय्यद, जुबेर मनियार, महेमुद मिस्त्री, अ. माजिद टेलर, वसीम खान, डॉ. अब्दुल मतीन अकील शेख, मुस्तफा चौधरी आदींच्या स्वाक्ष:या आहेत.