शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागात पावसाची प्रतिक्षा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 16:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने येथील शेतक:यांना अजून पावसाची प्रतिक्षा आह़े पावसाने उघडीप घेतली असल्याने शेतकरी तोवर इतर मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देत आहेत़ पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक असल्याने श्रावणधारा कधी कोसळता नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, भालेर, न्याहली, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने येथील शेतक:यांना अजून पावसाची प्रतिक्षा आह़े पावसाने उघडीप घेतली असल्याने शेतकरी तोवर इतर मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देत आहेत़ पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक असल्याने श्रावणधारा कधी कोसळता नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, भालेर, न्याहली, धानोरा, कोठली आदी परिसरात गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आह़े त्यामुळे शेतक:यांना पिकांची चिंता लागून आह़े पावसाचे दोन महिने उलटले आल़े परंतु या दोन महिन्यात एक-दोन अपवाद वगळता इतर काळ हा कोरडाच गेला असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे पिकांना जगविण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े पाऊस नसल्याने परिसरातील नद्या नालेदेखील कोरडे पडत आहेत़ त्यामुळे ऐन श्रावणमासात शेतक:यांना पाण्याची विवंचना करावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े पावसाळा असूनही शेतशिवारातील विहिरींची पाणीपातळी खालावली आह़े काही विहिरी तर कोरडय़ाठाक पडल्या आहेत़ दोन महिन्यांपासून दमदार पावसाअभावी कापूस, मिरची, मका, कांदा आदी पिकं पुर्ण क्षमतेने येण्याची शाश्वती कमी झाली आह़े त्यामुळे पिकावर पावसाअभावी संक्रांत ओढावली असल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आह़े गेल्या काही दिवसांपासून शनिमांडळ व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण आह़े त्यामुळे याचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पिकांची वाढ खुंटली असून येत्या काही दिवसात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास पिकं करपण्या धोकाही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना पिकांसाठी पोटाला चिमटा काढून तसेच विविध ठिकाणाहून कर्जाचा बोजा करुन खत बि-बियाणे आदींवर हजारो रुपये खर्च केली आहेत़ त्यामुळे साहजीकच शेतक:यांचे संपूर्ण आर्थिक गणित हे यापासून निघणा:या उत्पन्नावर आह़े परंतु पावसाने पाठ फिरवल्यो शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला असल्याची स्थिती निर्माण झाली आह़े दरम्यान, मुग, उडीद चवळी आदी पिकांची स्थितीदेखील काही वेगळी नाही़ ही पिके ऐन फुलो:यावर असून पाण्याची गरज आह़े येत्या चार पाच दिवसात पाऊस आला नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आह़े