शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोगदा : असून अडचण, नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुर्ण करण्यात आले आहे. परंतु रेल्वेच्या परवाणगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुर्ण करण्यात आले आहे. परंतु रेल्वेच्या परवाणगी अभावी ते धूळखात पडून आहेत. राजकीय श्रेयाचा वादात हे बोगदे अडकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहरवासीयांच्या अडचणीचा विचार करून या कामाला प्राधान्य द्यावे अशी मागणी होत आहे. उड्डाणपुलावरील वाहतुकीची मर्यादा लक्षात घेता अनेक वाहनचालक नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचा वापर करतात. परंतु या ठिकाणच्या अडचणींमुळे वाहनचालकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागते. शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु दहा वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याद्वारे देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. परंतु निधी मंजुर होताच निवडणुका लागल्या आणि भाजप सरकार सत्तेत आले. नंतर बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर संबधीत ठेकेदाराने या बोगद्यांचे काम अत्याधुनिक पद्धतीने केले. काम पुर्ण होऊन वर्ष लोटले आहे. परंतु बोगदे त्यांच्या जागी अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे  नसून अडचण व असून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. यासंदर्भात गांभिर्याने घेवून दोन्ही बोगदे बसविण्यात येवून कार्यान्वीत करावे, अशी मागणी आहे.