दोन स्थानकांदरम्यान रेल्वेगेट असलेल्या ठिकाणी धावणारी रेल्वे संबंधित स्थानकावर पोहचल्यावर रेल्वेगटमनला सुचना दिली जाते. त्यानंतरच ते उघडले जाते. अशा वेळी दोन रेल्वेंची येण्याची व जाण्याची वेळ दहा ते १५ मिनिटांच्या अंतरात असली तर असे रेल्वेगेट किमान ३५ ते ५० मिनिटे बंद राहत आहे. दोन दिवसांपूर्वी भादवडचे रेल्वेगेट तब्बल ५० मिनिटे बंद होते. दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील रेल्वेगेट एवढा वेळ बंद असल्याने वाहनधारकांची तसेच शेतात कामासाठी जाणाऱ्यांची मोठी हाल झाली. यावेळी दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात काही पेशंटदेखील होते. वारंवारच्या या प्रकारामुळे त्या त्या भागातील ग्रामस्थ, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
पूर्वीप्रमाणेच रेल्वेगेट सुरू करणे व बंद करण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहे.