शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रनाळे ते दोंडाईचा दरम्यान ताशी 120 कि.मी.ने धावली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:08 IST

चाचणी पुर्ण : जूनपासून वापरात येणार रेल्वे मार्ग

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : नंदुरबार-दोंडाईचा नवीन दुहेरी रेल्वेमार्गाच्या रनाळे ते दोंडाईचा दरम्यानच्या मार्गाची सोमवारी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या 35 किलोमिटर रेल्वेमार्गावर ताशी 120 किलोमिटर वेगाने रेल्वे चालविण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता हा मार्ग प्रत्यक्षात वापरात येणार आहे.  उधना-जळगाव या 306 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले असून शेवटच्या टप्प्यातील नंदुरबार-दोंडाईचा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाची चाचणी रविवार व सोमवारी घेण्यात आली. चाचणी घेणा:या अधिका:यांमध्ये सुशिल चंद्र, एम.के.गुप्ता, संजय मिश्रा, विलास वाडेकर, श्रीनिवासन, संजीव भुताणी, एन.डी.कुंभेर, मेंढेकर यांचा समावेश होता.रविवारी नंदुरबार ते रनाळे दरम्यान तर सोमवारी रनाळे ते दोंडाईचा दरम्यानची चाचणी झाली. छोटय़ा ट्रॉलीवरून रुळांचे परिक्षण पुर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी या मार्गावरून रेल्वे चालविण्यात     आली. ताशी 100 ते 120 किलोमिटर वेगाने रेल्वे धावली. त्यातही पश्चिम रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नवीन रुळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या.आता या चाचणीचा अहवालानंतर हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात वापरात येणार आहे. साधारणत: जून महिन्याच्या दुस:या आठवडय़ापासून उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वापरात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. भर उन्हात चाचणीदोन दिवसात ट्रॉलीद्वारे भर उन्हात रुळांचे परिक्षण करण्यात आले. त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांचे भर उन्हात मोठे हाल झाले.  संपुर्ण 35 किलोमिटर रुळाचे परिक्षण करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान या मार्गावरून प्रत्यक्षात चाचणी रेल्वे चालविणत आली. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या.