n लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नंदुरबार , दोंडाईचा भागातील दोनशेहून अधिक जणांनी सारंगखेडा तापी पुलावर रास्तारोको केला. आंदोलन थांबावे यासाठी पीडित कुटुंबाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी विनंती केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. एखाद्या पिडित कुटुंबाला आंदोलकांच्या भेटीसाठी आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. आंदोलकांचा आक्रमणामुळे शहादा, दोंडाईचा रस्त्यावर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.प्रेमसंबंधाच्या नकारावरुन एका अल्पवयीन मुलीची २३ ऑक्टोबरला मध्यरात्री निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना सारंगखेडा येथे घडली होती . या प्रकरणी राज्यभरात तिव्र पडसाद उमटले असून ठिकठिकाणी संघटनांकडून निषेद नोंदविण्यात येत आहेत. सारंगखेडा येथे ४ नोव्हेंबर रोजी २००जणांच्या जमावाने आंदोलन केले. या प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येईल या बाबत सोशल मिडीयावर काही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी क्लिप व्हायरल केली होती . मात्र पोलीसांनी मध्यस्थी करुन आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतू आंदोलन मागे घेण्यात आल्याचे काही समाज बांधवाना माहीती न मिळाल्याने नंदूरबार, दोडाईचा ग्रामीण भागातून दोनशेहून अधिक आंदोलक तापी पुलापर्यंत आल्यावर पोलीसांनी अडवून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आक्रमक होऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्या, या मागणीवर ठाम होते. समजूत घालण्यासाठी दिड तास रास्ता रोको आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. पर्यायाने दोन्ही मार्गावर सुमारे सात किलोमिटर लांबीचा रांगा लागल्या होत्या . हे आंदोलन थांबावे यासाठी पीडीत कुटुंबाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या विनंतीनंतर हे आंदोलन थांबवण्यात प्रयत्न झाले. एखाद्या पीडित कुटुंबाला आंदोलकांच्या भेटीसाठी आणण्याची ही पहिलीच वेळ आहे . विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरिक्षक पोलीस निरीक्षक नंदवाळकर, पोलीस निरिक्षक पंडीत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस उप निरिक्षक मुकेश पवार, महाले, पोलीस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी आदी उपस्थित होते.
पोलिसांनी सावधानता बाळगलीयेथील पिडीतीचा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी . यासाठी येथे आंदोलन करण्याची काही समाज बांधवांनी सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल केली होती . त्या पार्श्वभूमीवर पहाटे पासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन करण्याची शक्यता पोलीसांना गृहीत धरून तशी बंदोबस्ताची व्यूहरचना केली. गावात अनुचित प्रकार होणार नाही म्हणून आठवडयाभरापासून चोख बंदोबस्त ठेवला आहे .