प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैजाली येथील उपकेंद्रात पाचव्या टप्प्यातील लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.लसीकरणासाठी वैजाली, नांदर्डे व करणखेडा येथील नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. विशेष म्हणजे दिवसभर पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी रांगा लावल्या. परंतु फक्त १५० लसींचे डोस उपलब्ध झाल्याने अनेकांना लसीअभावी परत जावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. सध्या नागरिकांचा कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लसीचे डोस वाढवून परिसरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोते, आरोग्य सेविका माधुरी ठाकरे, माध्यमिक शिक्षक पी.एस. पाटील, माजी सरपंच विनोद पाटील, ग्रामशिक्षण समितीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी पोलीस पाटील, श्रीराम पाटील, सुनील पाटील, सुभाष पाटील, संजय चव्हाण, ईश्वर गिरासे, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका उपस्थित होते.
वैजाली येथे लसीकरणासाठी भरपावसात लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST